CSK vs LSG : ‘मला हा चेहरा पुन्हा पाहायचा नाही’, CSK फॅन्सचा संताप, ‘या’ खेळाडूला घातल्या शिव्या

CSK vs LSG : चेन्नई सुपर किंग्सचा यंदाच्या सीजनमध्ये 8 पैकी चौथ्या सामन्यात पराभव झाला. या मॅचआधी सुद्धा चेन्नईचा पराभव झाला होता. चेन्नई फॅन्सच्या हा पराभव जिव्हारी लागणारा आहे, कारण घरच्या मैदानात होम ग्राऊंड एमए चिदंबरम स्टेडियमवर हा पराभव झाला, ते सुद्धा 210 इतका मजबूत स्कोर करुन.

CSK vs LSG :  'मला हा चेहरा पुन्हा पाहायचा नाही', CSK फॅन्सचा संताप, 'या' खेळाडूला घातल्या शिव्या
CSK lost Against LSGImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 12:33 PM

चेन्नई सुपर किंग्ससाठी IPL 2024 चा सीजन चढ-उतारांनी भरलेला आहे. नवीन कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली डिफेंडिंग चॅम्पियन CSK च्या विजयात सातत्य नाहीय. मध्ये-मध्ये त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागतोय. काल लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला हरवलं. केएल राहुलच्या टीमने रोमांचक सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. लखनऊच्या या विजयात मार्कस स्टोयनिसने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने शानदार शतक झळकावलं. चेन्नईचे फॅन्स आपल्याच एका खेळाडूवर नाराज आहेत. या खेळाडूला ते शिव्या देत आहेत. त्याला टीममधून बाहेर काढण्याची मागणी होतेय.

CSK च्या पराभवाला अनेक कारणं आहेत. पण फॅन्सच्या नजरेत एकमेळ खेळाडू विलन आहे, तो म्हणजे दीपक चाहर. या मॅचमध्ये दीपक चाहरने अपेक्षित गोलंदाजी केली नाही. चाहरने सुरुवात चांगली केली. पहिल्याच ओव्हरमध्ये क्विंटन डिकॉकला खातही उघडू दिलं नाही. पावरप्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याने फक्त 11 धावा दिल्या. त्यानंतर त्याला गोलंदाजी मिळाली नाही. फिल्डिंगमधील त्याच्या चूका टीमला महाग पडल्या. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये चाहरने 3 वेळा चूक केली. चेन्नईला त्याची किंमत चुकवावी लागली.

काय 3 चूका केल्या?

सर्वप्रथम 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चाहरने चेंडू रोखण्याची सोपी संधी सोडली. त्यामुळे चौकार गेला. 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चाहरने सर्वात मोठी चूक केली. मार्क स्टॉयनिसने मोठा फटका खेळला. पण बाऊंड्रीवर तैनात असलेला चाहर कॅच पकडू शकला नाही. चेंडू हाताला लागून सिक्स गेला. पुढच्याच ओव्हरमध्ये चाहर पुन्हा चौकार रोखू शकला नाही. अखेर मार्क स्टॉयनिसने लखनऊला विजय मिळवून दिला.

टीममधून बाहेर काढण्याची मागणी

सोशल मीडियार चेन्नईच्या फॅन्सना हा पराभव सहन झाला नाही. त्यांनी चाहरबद्दल अपशब्द वापरले. ‘एक्स’ पासून इंस्टाग्रामपर्यंत चाहरला शिव्या दिल्या जात आहेत. दीपक चाहर मागच्या सात सीजनपासून टीमचा भाग आहे. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये CSK ने त्याच्यासाठी 14 कोटीची बोली लावली. चेन्नईचे फॅन्स आता त्याला टीममधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

CSK पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर?

IPL 2024 च्या सीजनमध्ये चेन्नईचा 8 पैकी 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचा लखनऊनकडून झालेला पराभव टीम आणि फॅन्सच्या जिव्हारी लागणारा आहे. घरच्या मैदानावर सीएसकेने नेहमीच शानदार प्रदर्शन केलं आहे. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये CSK पाचव्या स्थानावर आहे. अजूनही ते प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.