मुंबई: टीम इंडिया (Team India) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) अलीकडेच आयुष्यात नवी इनिंग सुरु केली. या महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या धूमधडाक्यात दीपक चाहरच गर्लफ्रेंड जया भारद्वाज सोबत लग्न झालं. चाहरने आतापर्यंत लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलीकडेच त्याने संगीतचा एक व्हिडिओ शेअर केला. चाहत्यांना दीपक चाहरचा हा व्हिडिओ आवडला असून त्यावर अनेक कमेंटही आल्या आहेत. संगीतच्या या व्हिडिओमध्ये दीपक चाहर पत्नी जया सोबत डान्स करताना दिसतोय. दीपकच्या तुलनेत जया थोडी जास्त मोकळेपणाने नाचली. पण दीपकही मागे नव्हता. त्याने उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलाय.
अक्षय कुमारचा हिट चित्रपट ‘खिलाडी’ मधील ‘अकेला हे मिस्टर खिलाडी’ या गाण्यावर डान्स केला. जयाने कभी खुशी कभी गम चित्रपटातील बोले चुडिया गाण्यावर परफॉर्म केलं. हा व्हिडिओ शेअर करताना दीपक चाहरने, या गाण्यावर परफॉर्म करताना, क्रिकेट मॅचपेक्षाही माझ्यावर जास्त दबाव होता, असं म्हटलं आहे. काही फॅन्सनी त्याला बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांना दीपक चाहरचा डान्स भरपूर आवडला.
View this post on Instagram
मागच्यावर्षी आयपीएलच्या वेळीच दीपक चाहरने जया भारद्वाजला प्रपोज केलं होतं. केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर दीपकने स्टँडसमध्ये जाऊन सामना पहायला आलेल्या जयाला प्रपोज केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दीपक चाहर सध्या त्याच्या दुखापतीमधून सावरतोय. एनसीएमध्ये त्याचा रिहॅबचा कार्यक्रम सुरु आहे. त्याला पाठिची दुखापत झाली आहे. यामुळेच तो यंदाच्या आयपीएलमध्ये सीजनमध्ये खेळू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्सने त्याला 14 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.