Deepak Chahar : जिंकलंस भावा, मालती चहरकडून खास व्हिडीओ शेअर, आनंद गगनात मावेना

संघातील वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू बाद झालेले असताना देखील अष्टपैलू खेळाडू आणि धोनीचा हुकुमी एक्का असलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) शेवटपर्यंत खिंड लढवून भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

Deepak Chahar : जिंकलंस भावा, मालती चहरकडून खास व्हिडीओ शेअर, आनंद गगनात मावेना
मालती चहर

मुंबई : संघातील वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू बाद झालेले असताना देखील अष्टपैलू खेळाडू आणि धोनीचा हुकुमी एक्का असलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) शेवटपर्यंत खिंड लढवून भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या विजयानंतर दीपक चाहरचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर, दुसरीकडे त्याची बहीण मालती चहर (Malti Chahar) हिने देखील एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या भावाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

अटीतटीच्या या मॅचमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर (India vs Sri Lanka) तीन विकेट्सने मात करत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. सामन्यात एकवेळ अशी आली होती की, भारताचा पराभव होईल असं वाटत होतं पण दीपकने सामन्याची सूत्रं हातात घेऊन सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रीलंकन संघाने भारताच्या प्रमुख खेळाडूंना बाद केलं, पण एकटा दीपक श्रीलंकेवर भारी पडला.

काय म्हणाली मालती?

मालिका जिंकत अवघ्या देशाची मान उंचावणाऱ्या दीपकचे कौतुक करताना बहीण मालती चहर लिहिते, ‘आणि तू करून दाखवलंस…भारतासाठी सामना जिंकलास आणि भरतीयांची माने देखील! दीपक तू स्टार आहेस आणि असाच चमकत राहा.’

पाहा पोस्ट :

कोण आहे मालती चहर?

भाऊ दीपक प्रमाणेच त्याची बहीण मालती चहरही नेहमीच चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. मालती सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या बर्‍याच मोठ्या नायिकांशी स्पर्धा करते. जेव्हा मालती चहर पहिल्यांदा 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात दिसली होती, तेव्हा ती चर्चेत आली होती. त्यानंतर ती चेन्नईच्या विजयाबद्दल आनंदित दिसली आणि पराभवावर रडताना देखील दिसली. यानंतर इंटरनेटवरही मालतीला सर्च करण्यात आले. त्यावेळी मालती रातोरात प्रसिद्ध झाली. 2018 मध्ये तिला ‘मिस्ट्री गर्ल’ म्हटले गेले होते.

मालती चहर एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती 2018 मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटात दिसली होती. यासोबतच ती ‘सद्दा जलवा’ गाण्यातही दिसली होती. मालती सॉफ्टवेअर अभियंता असूनही तिने करिअर म्हणून अभिनय आणि मॉडेलिंगची निवड केली आहे. सोशल मीडियावरही तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

याचबरोबर मालती चहर 2014 मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या ‘एफबीबी फेमिना मिस इंडिया’ची सेकंड रनर अप होती. तिला नृत्य, चित्रकला आणि साहसी खेळ खूप आवडतात.

(Deepak Chahar’s Sister Malti Chahar congratulate her brother with special video)

 हेही वाचा :

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग