AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: अजित आगरकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, IPL मधल्या संघाचे बनले कोच

भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit agarkar) टीम इंडियाचे बॉलिंग कोच बनू शकतात. भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे.

IPL 2022: अजित आगरकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, IPL मधल्या संघाचे बनले कोच
| Updated on: Feb 24, 2022 | 6:06 PM
Share

मुंबई: भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit agarkar) टीम इंडियाचे बॉलिंग कोच बनू शकतात. भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. टीम इंडियातूनच सिनियर खेळाडूंनी अजित आगरकरांना बॉलिंग कोच बनवण्याची मागणी केली आहे. लगेच यावर कुठला निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. सध्या पारस म्हांब्रेकडे ही जबाबदारी आहे. अजित आगरकरांना भारतीय संघात कधी रोल मिळणार? या बद्दल स्पष्टता नसली, तरी IPL मध्ये त्याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहाय्यक कोच म्हणून अजित आगरकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते समालोचक आहेत. समालोचनाची जबाबदारी संपल्यानंतर ते दिल्ली संघासोबत काम सुरु करतील.

मायदेशात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत समालोचकाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होण्यासाठी, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक्त आहे, असे आगरकरने म्हटलं आहे. रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच आहेत, तर ऋषभ पंत कर्णधार आहे.

“मी भाग्यवान समजतो, मी एक खेळाडू होतो. मी आता दुसऱ्या भूमिकेत येत आहे. आमच्याकडे युवा आणि उत्तम खेळाडूंचा भरणा असलेला एक चांगला संघ आहे. ऋषभ पंत सारखा प्रतिभावान खेळाडू कर्णधार आहे” असं अजित आगरकर म्हणाले.

अजित आगरकरचा रेकॉर्ड

अजित आगरकर सध्या क्रिकेट एक्सपर्ट म्हणून वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडत असतात. अजित आगरकर यांच्याकडे भारताकडून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. 1998 ते 2007 या काळात आगरकर भारताकडून 28 कसोटी, 191 वनडे आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 47.32 च्या सरासरीने त्यांनी 58 विकेट घेतल्या आहेत. वनडेत 27.85 च्या सरासरीने 288 विकेट आणि चार टी-20 सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. 44 वर्षीय अजित आगरकर मागच्यावर्षी चीफ सिलेक्टर बनण्याच्या शर्यतीत होते. सध्या ते टीव्ही कॉमेंटेटर आहेत.

Delhi Capitals confirm Ajit Agarkar’s appointment as assistant coach

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.