
आयपीएल 2025 स्पर्धेवर भारत पाकिस्तान तणावाचा प्रभाव पडला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री सीमेलगतच्या भागांवर हल्ले केले. या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु होता. मात्र हा सामना अर्धवट थांबवण्याचा निर्णय घेतला. धर्मशाळेजवळ असलेल्या जम्मू काश्मीर आणि पंजाबवर हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला. पण मैदानातील वातावरण पॅनिक होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. सुरुवातीला फ्लड लाईट खराब झाल्याने सामना थांबवल्याचं सांगितलं. त्यानंतर धर्मशाळा क्रिकेट मैदानातून प्रेक्षक आणि टीमला बाहेर काढलं.मैदानात उपस्थित असलेल्या बहुतांश प्रेक्षकांना असं का केलं जात आहे याची जाणीव होती. त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं आणि मैदानाबाहेर पडेल. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक चीयरलीडर खूपच घाबरली असल्याचं दिसत आहे. यावेळी तिने तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु होता. या सामन्यातील 10.1 षटकांचा खेळ झाला असून 122 धावा झाल्या होत्या. यानंतर मैदानातील एक टॉवर लाईट बंद झाला. त्यानंतर दुसरा लाईट टॉवर बंद झाला आणि खेळाडूंना तात्काळ मैदानाबाहेर काढलं गेलं. काही वेळाने सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मैदानात भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. असं का झालं असेल याची चर्चाही रंगली. मात्र प्रेक्षकांनी प्रशासनाला सहकार्य केलं आणि बाहेर पडले.
“Very very scary” – Cheer leader’s SHOCKING video from Punjab Kings Vs Delhi Capitals IPL match in Dharamshala. pic.twitter.com/S830aDKer3
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) May 8, 2025
चीयरलीडरने सांगितलं की, ‘सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम रिकामी केलं होतं. सर्व काही भीतीदायक होतं. प्रत्येक जण ओरडत होता की बॉम्ब येत आहेत. हे आताही भीतीदायक आहे. आम्ही धर्मशाळेतून बाहेर जाऊ इच्छित आहोत. मला आशा आहे की, आयपीएलमधील लोकं आमची काळजी घेतील. पण हे खूपच भीती वाढवणारं आहे. मला माहिती नाही मी रडत आहे. मला वाटते की मला मानसिक धक्का बसला आहे की आणखी काय झालं आहे.’ असं चीयरलीडर्स या व्हायरल व्हिडीओत सांगत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्ट संघांना ट्रेनने सुरक्षित स्थळी हलवलं जाईल. ऊनाहून एक स्पेशल ट्रेन धावणार असून खेळाडूंना घेऊन दिल्लीला येईल.