AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni च्या सख्ख्या भावाचा इंटरनेटवर असा फोटो होतोय व्हायरल, लोकांनी विचारला प्रश्न

MS Dhoni Brother Photos Viral : एमएस धोनीला एक मोठा भाऊ आहे, याबद्दल तुम्हाला माहित आहे का? हे खरं आहे. क्रिकेट चाहत्यांना आजही एमएस धोनीच्या मोठ्या भावाबद्दल माहित नाहीय.

MS Dhoni च्या सख्ख्या भावाचा इंटरनेटवर असा फोटो होतोय व्हायरल, लोकांनी विचारला प्रश्न
ms dhoni big brother photo viral
| Updated on: Jun 11, 2023 | 9:58 AM
Share

नवी दिल्ली : MS Dhoni च क्रिकेट करीयर आणि त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल बऱ्याच जणांना माहित आहे. पण एमएस धोनीला एक भाऊ आहे, हे तुम्हाला माहित आहे का?. एमएस धोनीला एका मोठा भाऊ आहे, हे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाहीय. सोशल मीडियावर काही जणांनी एमएस धोनीचा भाऊ नरेंद्र सिंह धोनीला शोधून काढलय. अलीकडेच एका टि्वटर युजरने नरेंद्र सिंह धोनीचा एक जुना फेसबुक फोटो पोस्ट केला.

“हेच कारण आहे, एमएस धोनीने आपल्या बायोपिकमध्ये भावाचा उल्लेख केलेला नाहीय” असं कॅप्शनमध्ये लिहिलय. यूजरने फोटो शेयर करताना, नरेंद्र सिंह धोनीची टीका करणारी शायरीची पोस्ट शेयर केलीय.

‘हे खरं आहे का?’

फॅन्सनी नरेंद्रच सोशल मीडिया अकाऊंट शोधून काढलं व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करतायत. @1no_aalsi_ नामक टि्वटर युजरने नरेंद्रच्या जुन्या फेसबुक पोस्टचे स्क्रिनशॉट शेयर करताच इंटरनेटवर आग लागली. ‘धोनी सोशल मीडियाचा उपयोग का नाही करत?’ असं एक युजरने लिहिलय. ‘हे खरं आहे का?’ असं दुसऱ्या एका युजरने म्हटलय.

नरेंद्रचे धोनीसोबत कसे आहेत संबंध ?

नरेंद्र सिंह धोनीचे इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट आहेत. 2017 पर्यंतच्या पोस्टवर फॅन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नरेंद्रने एमएस धोनीची मुलगी जीवासोबतचे काही फोटो शेयर केलेत. नरेंद्र एमएस धोनीपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. तो राजकारणात आहे. धोनीचा मोठा भाऊ काय करतो?

2013 पासून नरेंद्र समाजावादी पार्टीशी संबंधित आहे. याआधी तो भाजपाता होता. नरेंद्र सिंह धोनीला एक मुलगी आणि मुलगा आहे. एका इंटरव्यूमध्ये नरेंद्रने छोट्या भावासोबत चांगलं नात असल्याच सांगितलं होतं.

Follow Us
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ