दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शम्स मुलानी श्रेयस अय्यरवर पडला भारी! तर इशान-इंद्रजीथची जबरदस्त खेळी
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या सामन्यातील पहिला दिवसांचा खेळ संपला आहे. इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आणि इंडिया सी विरुद्ध इंडिया बी यांच्यात लढत सुरु आहे. या दोन्ही सामन्यात शम्स मुलानी, इशान किशन आणी बाबा इंद्रजीथने लक्ष वेधून घेतलं.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरु आहेत. यात इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आणि इंडिया सी विरुद्ध इंडिया बी यांच्यात लढत होत आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवसी इंडिया बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडिया सी संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी पाच गडी गमवून 357 धावा केल्या. हा दिवशी इशान किशन आणि बाबा इंद्रजिथ यांनी गाजवला. तिसऱ्या गड्यासाठी या दोघांनी जबरदस्त भागीदारी केली. तसेच संघाला 350 पार नेण्यास मदत केली. इशान किशनने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं. त्याने 126 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने 111 धावा केल्या. तर बाबा इंद्रजिथने 136 चेंडू खेळत 9 चौकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. इंडिया बी संघाकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर नवदीप सैनी आणि राहुल चहरने प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋतुराज गायकवाड नाबाद 46 आणि मानव सुथार नाबाद 8 धावांवर खेळत आहे.
इंडिया बी आणि इंडिया सी संघाची प्लेइंग 11
इंडिया सी (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड (कर्णधार), इशान किशन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, बाबा इंद्रजित, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मानव सुथार, अंशुल कंबोज, मयंक मार्कंडे, विजयकुमार विशाक, संदीप वॉरियर.
इंडिया बी (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू इसवरन (कर्णधार), एन जगदीसन (विकेटकीपर), मुशीर खान, सरफराज खान, रिंकू सिंग, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर
दुसरीकडे, इंडिया ए आणि इंडिया डी यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात शम्स मुलानी आणि तनुष कोटीयन श्रेयस अय्यरच्या इंडिया डी संघावर भारी पडले. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले असताना या दोघांनी इंडिया डी संघाला मेटाकुटिस आणलं. शम्स मुलानी अजूनही मैदानात असून त्याने 174 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. तर तनुष कोटियनने 80 चेंडूत 53 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया ए संघाने 8 गडी गमवून 288 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात शम्स मुलानी 12 धावा करून शतक ठोकणार का? याकडे लक्ष लागून आहे.
इंडिया ए आणि इंडिया डी संघांची प्लेइं इलेव्हन
इंडिया डी (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, यश दुबे, श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, सौरभ कुमार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा.
इंडिया ए (प्लेइंग इलेव्हन): प्रथमसिंग, मयंक अग्रवाल (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, शाश्वत रावत, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आकिब खान.