ENG vs AUS : इंग्लंडचा करो या मरो सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, ऑस्ट्रेलियाकडून 2 बदल
England vs Australia 3rd Odi Toss And Playing 11: यजमान इंग्लंड संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी तिसरा सामना हा करो या मरो असा आहे.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i सीरिजनंतर 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हॅरी ब्रूक हा इंग्लंडचं नेतृत्व करतोय. तर मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या मालिकेतील तिसरा सामना हा आज 24 सप्टेंबर रोजी रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट येथे करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 5 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडने टॉस जिंकला. यजमान संघाने फिल्डिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक झालं आहे. तर ओली स्टोन याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर कांगारुंनी 2 बदल केले आहेत. ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन आणि सीन एबॉटला संधी दिली गेली आहे. तर फिरकी गोलंदाज एडम झॅम्पा आणि विस्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला दोघांना बाहेर बसवण्यात आलं आहे.
इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ सामना
इंग्लंड या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडे या सामन्यात विजयी हॅटट्रिक पूर्ण करत मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरली आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसाठी हा प्रतिष्ठेचा सामना आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता या सामन्याचा काय निकाल लागतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड आर या पारच्या लढाईसाठी सज्ज
Let’s go! Wickets in our sights 🏏 Live clips/scorecard 👇 🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) September 24, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कॅप्टन), स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि मॅथ्यू पॉट्स.
