ENG vs IND : यशस्वीची कमाल, शतक हुकलं मात्र रोहितला पछाडलं, माजी कर्णधाराचा रेकॉर्ड ब्रेक
Yashasvi Jaiswal Break Rohit Sharma Record : यशस्वी जैस्वाल याला इंग्लंड विरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात शतक करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र इंग्लंडच्या कर्णधाराने यशस्वीला 13 धावांआधी रोखलं. स्टोक्सने यशस्वीला 87 धावांवर बाद केलं. मात्र यशस्वीने या खेळीसह हिटमॅनचा रेकॉर्ड ब्रेक केला.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने या सामन्यात अप्रतिम सुरुवात केली. यशस्वीने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं होतं. यशस्वीला दुसऱ्या कसोटीतही शतक करण्याची संधी होती. मात्र यशस्वी शतक करण्यात अपयशी ठरला. मात्र यशस्वीने अर्धशतकी खेळीसह माजी कर्णधार रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यशस्वीने रोहितला सेना देशात सर्वाधिक 50+ धावा करण्याबाबत मागे टाकलं आहे.
ओपनर यशस्वीची तडाखेदार खेळी
माजी कर्णधार रोहित शर्मा याने ओपनर म्हणून सेना देशात (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 4 वेळा 50+ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर यशस्वीची ओपनर म्हणून 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली.
यशस्वीने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 59 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने अर्धशतकानंतर धावा करणं सुरुच ठेवलं आणि सलग दुसऱ्या शतकाच्या जवळ येऊन पोहचला. मात्र यशस्वी शतकापासून 13 धावांनी दूर असतानाच आऊट झाला. यशस्वीला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने विकेटकीपर जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 107 बॉलमध्ये 81.31 च्या स्ट्राईक रेटने 87 रन्स केल्या. यशस्वीने या खेळीत 13 चौकार ठोकले.
यशस्वी जैस्वाल याचा 50+ चा ‘पंच’
यशस्वीने लीड्समध्ये 101 रन्स केल्या. त्याआधी यशस्वीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 391 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल याने पर्थ कसोटीत 161 धावांची खेळी केली होती. तर मेलबर्नमधील सामन्यात 82 आणि 84 धावा केल्या होत्या.
यशस्वीच्या इंग्लंड विरुद्धच्या धावा
80 in Hyderabad. 209 in Vizag. 214* in Rajkot. 73 in Ranchi. 57 in Dharamsala. 101 in Leeds. 87 in Edgbaston.
YASHASVI JAISWAL AGAINST ENGLAND IN TEST CRICKET 🫡 pic.twitter.com/oWKKDZYdQL
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2025
ओपनर म्हणून रोहित शर्माची कामगिरी
तसेच रोहितने सेना देशात ओपनर म्हणून इंग्लंड विरुद्ध 3 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने इंग्लंडनेमध्ये 6 कसोटी सामन्यांत 44.54 च्या सरासरीने 490 धावा केल्यात. रोहितने या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया ओपनर म्हणून 1 अर्धशतक केलं आहे. दरम्यान रोहितने इंग्लंड विरूद्धच्या मालिकेआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळतान दिसणार आहे.
