ENG vs IND : टीम इंडिया पाचव्या कसोटीसाठी सज्ज, इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखणार?

England vs India 5th Test Live And Digital Streaming : भारतीय क्रिकेट संघ शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हा 31 जुलैपासून खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असल्याने पाचवा सामना हा करो या मरो असा आहे.

ENG vs IND : टीम इंडिया पाचव्या कसोटीसाठी सज्ज, इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखणार?
KL Rahul Eng vs Ind Test
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jul 31, 2025 | 12:41 AM

टीम इंडिया इंग्लंड विरूद्धचा कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.त्यामुळे इंग्लंडला हा सामना बरोबरीत सोडवून किंवा विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी हा सामना म्हणजे करो या मरो असा आहे. इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या सामन्यातील कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचव्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचव्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.

इंग्लंड सज्ज, भारताचं काय?

दरम्यान इंग्लंडने पाचव्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केलीय. त्यानुसार नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. तसेच जोफ्रा आर्चर याच्यासह तिघांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहे आणि कोण नाही, हे निश्चित आहे. मात्र भारताच्या प्लेइंग ईलेव्हनबाबत सस्पेन्स कायम आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? हे अजूनही नक्की नाही. भारताला सामना जिंकायचा असेल तर बुमराह असणं गरजेचं आहे. त्यामुळे बुमराह असणार की नसणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल. तसेच कॅप्टन शुबमन प्लेइंग ईलेव्हनबाबत आणखी काय निर्णय घेतो? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.