ENG vs IND : एक निश्चित वेळच नाही, इंग्लंड-इंडिया दुसरा सामना किती वाजता?

England vs India 2nd T20i : साधारणपणे बहुतांश मालिकेतील सामन्यांना एकाच वेळेस सुरुवात होते. मात्र इंग्लंड-इंडिया टी 20i मालिकेतील सामन्यांची निश्चित एक वेळ नाही. जाणून घ्या दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

ENG vs IND : एक निश्चित वेळच नाही, इंग्लंड-इंडिया दुसरा सामना किती वाजता?
Shreyas Iyer and Harry Brook
Image Credit source: Bcci
| Updated on: Jul 02, 2026 | 10:14 PM

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात पावसाने विघ्न घातलं. उभयसंघातील पहिला सामना हा 1 जुलैला चेस्टर ली स्ट्रीट येथील रिव्हरसाईड ग्राउंडमध्ये खेळवण्यात आला. मात्र पावसामुळे हा सामना निकाली निघाला नाही. पहिल्या डावानंतर वाढलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांची निराशा झाली. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरुवात झाली. भारताने अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर 189 धावा केल्या. मात्र पावसामुळे इंग्लंडच्या बॅटिंगआधीच नाईलाजाने सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

पावसाने पहिल्या सामन्याची मजा घालवली. चाहत्यांना भारताची फलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे गोलंदाज 189 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र पावसाने तसं होऊन दिलं नाही. त्यामुळे आता चाहत्यांना उभयसंघात होणाऱ्या दुसऱ्या टी 20I सामन्याची प्रतिक्षा लागून आहे. मात्र या मालिकेतील सामन्यांची एक निश्चित अशी वेळ नाहीय. त्यामुळे दुसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

क्रिकेट चाहत्यांना दुसऱ्या सामन्यासाठी झोपमोड करावी लागणार नाही. दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

दरम्यान टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ असल्याचं आकड्यांतून स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत एकूण 31 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 30 पैकी सर्वाधिक 18 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 12 सामन्यांत पलटवार केला आहे. तर एकमेव सामना हा पावसाने वाया घालवला आहे. त्यामुळे आता 32 व्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार),संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us