AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?

England vs India Odi Series : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळणार आहे. विराटने या मालिकेआधी फिटनेस टेस्ट क्लिअर केली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना विराट आणि रोहित या दोघांना एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे.

ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?
Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 22, 2026 | 10:30 PM
Share

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यासह वनडे सीरिजमध्ये पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. तर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता एकदिवसीय मालिकेने होणार आहे. इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रविवारी 21 जून रोजी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेतून भारतीय संघात अनुभवी फलंदाज विराट कोहली याचं पुनरागमन झालं आहे. त्यानंतर 24 तासांनी विराट कोहलीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

विराट कोहली फटकेबाजीसाठी सज्ज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. त्यामुळे विराट इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकतो. विराट फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याला खेळता येईल या अटीवर त्याला इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत स्थान देण्यात आलेलं. आता विराट फिट असल्याने भारतीय फलंदाजीची ताकद दुप्पटीने वाढली आहे.

भारतीय संघासह चाहत्यांना दिलासा

विराट फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने भारतीय संघासह चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विराटला याच दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं होतं. त्यात विराटला इंग्लंड विरुद्धही फिटनेसच्या अटीवरच संधी देण्यात आली होती. त्यामुळे विराट दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध खेळू शकणार की नाही? अशी चिंता सतावत होती. मात्र विराट फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे.

विराट 15 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?

दरम्यान विराट इंग्लंड दौऱ्यात 15 वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विराटने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीत इंग्लंडमध्ये फक्त एकमेव शतक झळकावलं आहे. विराटने 2011 साली 93 चेंडूत 107 धावा केल्या होत्या. मात्र तेव्हापासून विराटच्या इंग्लंडमधील एकदिवसीय शतकाची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. त्यामुळे विराट यंदा ही प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 जुलै, दुपारी साडे 3 वाजता

दुसरा सामना, 16 जुलै, संध्याकाळी साडे 5 वाजता

तिसरा सामना, 19 जुलै, दुपारी साडे 3 वाजता

इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी आणि गुरनूर ब्रार.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!