AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमाल

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला दिवस न्यूझीलंडच्या लॅथम आणि डेवॉन कॉनवे या जोडीने गाजवला. पहिल्या विकेटसाठी 300हून अधिक धावांची भागीदारी केली.

ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमाल
ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमालImage Credit source: New Zealand cricket Twitter
| Updated on: Jun 25, 2026 | 10:30 PM
Share

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. असं असताना न्यूझीलंडच्या बाजूने या सामन्याचा कौल लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय न्यूझीलंड संघाच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण या सामन्याचा पहिला दिवस डेवॉन कॉनवे आणि कर्णधार टॉम लॅथम यांनी गाजवला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 300हून अधिक धावांची भागीदारी केली. या जोडीने 433 चेंडूत 317 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार टॉम लॅथमने पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर डेवॉन कॉनवेने शतकी खेळी केली. डेवॉन कॉनवेने मागच्या दोन सामन्यातील अपयश मागे सोडत आठवं शतक झळकावलं.

लॅथमनंतर कॉनवेने शतक ठोकलं

नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियममध्ये गुरूवारी तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू झाला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक होताच फलंदाजी स्वीकारली. टॉम लॅथमने दुसऱ्या सेशनमध्ये 17वं शतक ठोकलं. त्यानंतर डेवॉन कॉनवेच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत होतं. कारण दुसऱ्या सेशनच्या शेवटी नाबाद 94 धावांवर होता. टी ब्रेकनंतर डेवॉन कॉनवे शतक ठोकणार का? याबाबत चर्चा होती. ब्रेकनंतर त्याची विकेट पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती. तिसरा सेशन सुरू होताच काही मिनिटात कॉनवेने शतक ठोकलं. इंग्लंडविरुद्ध कॉनवेचं दुसरं आणि कसोटी क्रिकेटमधील मागच्या 10 महिन्यातील चौथं शतक आहे.

तिसऱ्यांदा या जोडीने केली कमाल

लॅथम आणि कॉनवे या दोघांसाठी ही शतकी खेळी खूपच महत्त्वाची होती. कारण कसोटी क्रिकेटमध्ये 87व्यांदा एका डावात सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी शतक ठोकलं आहे. ही शतकी कामगिरी खास ठरली कार यापूर्वी 85व्या आणि 86व्या वेळी लॅथम आणि कॉनवे जोडीने ही कामगिरी केली होती. कॉनवे आणि लॅथमने डिसेंबर 2025 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एका टेस्ट सामन्यातील दोन डावात शतक ठोकलं होतं. कसोटी क्रिकेट इतिहासात हा एकमेव कसोटी सामना असा आहे की, एका सामन्यातील दोन डावात एकाच संघाच्या दोन सलामीवीरांनी शतक ठोकलं होतं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा