AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs PAK: इंग्लंडकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर बाबर आझमची सारवासारव, म्हणाला; “वर्ल्डकपमध्ये आम्ही…”

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान इंग्लंड यांच्या मालिका पार पडली. या मालिकेत इंग्लंडने पाकिस्तान 2-0 ने धोबीपछाड दिला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांना आतापासून चिंता लागली आहे. दुसरीकडे पराभवानंतरही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सारवासारव केला आहे.

ENG vs PAK: इंग्लंडकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर बाबर आझमची सारवासारव, म्हणाला; वर्ल्डकपमध्ये आम्ही...
Image Credit source: Twitter
| Updated on: May 31, 2024 | 7:22 PM
Share

इंग्लंड पाकिस्तान यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 2-0 ने खिशात घातली आणि व्हाईटवॉश दिला. दोन सामने पावसामुळे रद्द झाले तर दोन सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. आत्मविश्वास कमी झाल्याने पाकिस्तानचं टी20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगू शकतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 3 गडी गमवून 15.3 षटकात पूर्ण केलं. इंग्लंडने पाकिस्तानेवर 7 गडी आणि 27 चेंडू राखून विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपलं मत व्यक्त केलं आहे. पराभवानंतरही वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करू असं त्याने सांगितलं आहे. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये 6 जूनला अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे.

“पहिली सहा षटके आम्ही चांगली खेळली. त्यानंतर विकेट पडल्याने धावांचा वेग मंदावला. आमच्या मधल्या फळीला पुढे जाण्याची गरज होती. तुम्हाला मधल्या आणि डेथ ओव्हरमध्ये 2-3 चांगल्या ओव्हर्सची गरज होती. इंग्लंडची गोलंदाजी खूपच चांगली होती. आशा आहे की आम्ही विश्वचषकात असे करणार नाही. दुखापतींमुळे आम्ही काही बदल केले होते. आमचा पॉवरप्ले चांगला होता. आम्ही पॅचेसमध्ये चांगले क्रिकेट खेळलो आहे.”, असं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितलं. पाकिस्तानने शेवटचा टी20 वर्ल्डकप 2009 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा