ENG vs SL : रुटचं नाबाद अर्धशतक, इंग्लंडचा श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय
England vs Sri Lanka 1st Test Highlights: यजमान इंग्लंडने श्रीलंके विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. इंग्लंडने श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.

इंग्लंड क्रिकेट टीमने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान चौथ्या दिवशीच 5 विकेट्सच्या मोबदल्यात 57.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. उभयसंघातील या पहिल्या सामन्याचं आयोजन हे एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे करण्यात आलं होतं. तर दुसरा सामना हा 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंडची बॅटिंग
अनुभवी फलंदाज जो रुट हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात जो रुट याने सर्वाधिक धावा केल्या. रुटने 128 बॉलमध्ये 2 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. तर ख्रिस वोक्स याने नाबाद 8 धावांचं योगदान दिलं. ओपनर बेन डकेट याने 11 धावा केल्या. डॅनियल लॉरेन्स याने 54 बॉलमध्ये 34 धावा जोडल्या. कॅप्टन ओली पोप याने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. हॅरी ब्रूकने 32 धावांची भर घातली. तर पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जेमी स्मिथने 39 रन्स केल्या. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि प्रभाथ जयसूर्या या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर डेब्यूटंट मिलन रथनायके याला 1 विकेट घेण्यात यश आलं.
श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ स्थिती
दरम्यान श्रीलंकेने पहिला सामना गमावल्याने त्यांना आता मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर दुसऱ्या सामना कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल. तसेच श्रीलंकेला विजयी होता आलं नाही, तर किमान सामना बरोबरीत सोडवावाच लागेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पाहुण्या श्रीलंकेची खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे.
इंग्लंडची विजयी सलामी
🦁 Victory in Manchester! 🏴
A winning start to the series 💪
Match Centre: https://t.co/WlpxJWmDmV
🏴 #ENGvSL 🇱🇰 | #EnglandCricket pic.twitter.com/h3fGFuCyM1
— England Cricket (@englandcricket) August 24, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.
