ENG vs WI: जो रुट फक्त पहात बसला, फलंदाजी करताना त्याने बॉल सोडला आणि तितक्यात…पहा VIDEO

ENG vs WI: इंग्लंडचा क्रिकेट संघ (England Cricket Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये नॉर्थ साऊंड येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे.

ENG vs WI: जो रुट फक्त पहात बसला, फलंदाजी करताना त्याने बॉल सोडला आणि तितक्यात...पहा VIDEO
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 7:35 AM

गयाना: इंग्लंडचा क्रिकेट संघ (England Cricket Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये नॉर्थ साऊंड येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघासाठी आणि कर्णधार जो रुटसाठी (Joe Root) हा दौरा खास आहे. कारण मागच्याच महिन्यात Ashes सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे संघाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटची गणना सध्याच्या क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये होते. कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाच्या धारदार गोलंदाजीविरुद्ध धावा बनवण्याची त्याची क्षमता आहे. पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात यजमान संघाच्या केमार रोचच्या एका सुंदर चेंडूच रुटकडे कुठलही उत्तर नव्हतं.

जो रुटला चेंडू समजलाच नाही. त्याची किंमत त्याला स्वत:चा विकेट देऊन चुकवावी लागली. रुट फक्त चेंडूला पहात राहिला. पण तो काही करु शकला नाही. फलंदाजी करताना जो रुटचा सूर हरवला आहे. तो सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. Ashes सीरीज हरल्यानंतर त्याला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी सुद्धा झाली होती. Ashes मध्ये पाच कसोटी सामन्यात त्याने फक्त तीन अर्धशतक झळकावली होती.

त्याने चेंडू सोडला आणि…

केमर रोचने नवव्या षटकात एका अप्रतिम चेंडूवर जो रुटला आऊट केलं. षटकातील दुसरा चेंडू रोचने शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. चेंडूची उंची आणि दिशा समजून घेण्यात रुट कमी पडला. त्याला वाटलं चेंडू स्टंम्पसच्या बाजूने निघून जाईल. त्यामुळे त्याने बॅकफूटवर जाऊन स्टंम्प कव्हर करण्याचा प्रयत्नात चेंडू सोडला. पण चेंडूने अलगदपणे ऑफ स्टंम्पसच्या बेल्स उडवल्या. रुट ज्या पद्धतीने बाद झाला, तो पहातच राहिला. कारण त्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्याने 14 चेंडूत 13 धावा केल्या. यात तीन चौकार होते. इंग्लंडची टॉप ऑर्डर या सामन्यात पूर्णपणे फेल ठरली. एलेक्स लीस आणि जॅक क्रॉले यांची जोड़ी काही विशेष करु शकली नाही.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.