AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs ENG | धोनीचा ‘तो’ सल्ला डोक्यात एकदम फिट, इंग्लंडला हरवल्यावर कॅरेबियन कॅप्टनचा खुलासा

England vs West Indies : भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना झाला त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये वन डे सामना पार पडला. या सामन्यामध्ये कॅरेबियन संघाने इग्लंडला धूळ चारली, सामन्यानंतर कॅप्टन होपने धोनीच्या एक सल्ला डोक्यात फिट झाला असल्याचं सांगितला. नेमका कोणता आहे तो सल्ला जाणून घ्या.

WI vs  ENG | धोनीचा 'तो' सल्ला डोक्यात एकदम फिट, इंग्लंडला हरवल्यावर कॅरेबियन कॅप्टनचा खुलासा
| Updated on: Dec 04, 2023 | 5:38 PM
Share

मुंबई : यंदा भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये अपात्र ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडचा पराभव केला आहे. इग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्य पहिल्या वन डे सामन्यामध्ये वर्ल्ड कप विनर इंग्लंडला पराभूत केलं. शेवटच्या दोन ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात इंडिजचा कर्णधार शाई होपने षटकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 325 धावांचा पाठलाग वेस्ट इंडिज संघाने 49 ओव्हरमध्ये आव्हान पूर्ण केलं. या सामन्यानंतर बोलताना शाई होप याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सांगितलेल्या गोष्टीचा फायदा झाल्याचं सांगितलं.

इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करतान वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथानाझेने 66 धावांची खेळी करत चांगली सुरूवात केली होती. त्यानंतर शाई होपने नाबाद 109 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि चार चौकार मारले. त्यासोबतच रोमॅरियो शेफर्डने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 49 धावांची महत्त्वाची खेळी केली.

धोनीचा तो सल्ला डोक्यात फिट झालेला- होप

काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंह धोनीची भेट झाली होती, त्यावेळी धोनीने मला सांगितलं होतं की, तुम्ही मैदानात असताना तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे असतो. ही गोष्ट डोक्यात एकदम फिट झाल्याचं शाई होपने सांगितलं. शाई होपने या शतकासह वन डे मधील आपल्या 16 व्या शतकाला गवसणी घातली.

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रॅंडन किंग, अॅलिक अथानाझे, केसी कार्टी, शाई होप (C/W), शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओशाने थॉमस

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (C/W), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ब्रायडन कार्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.