Video : बेन स्टोक्सचं डोकंच फिरलं, 63 वर्षानंतर इंग्लंड कर्णधारासोबत असं घडलं
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी मजबूत स्थिती आहे. पिंक बॉल कसोटीत पहिल्या दिवशी 300 पार धावा केल्या आहेत. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यातील एशेज कसोटी मालिका म्हणजे द्वंद्वच… या कसोटी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पहिल्यांदाच धुरा सांभाळत आहे. पहिल्या कसोटीचा खेळ दोन दिवसातच संपला होता. पहिल्या कसोटीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत कमबॅकचं आव्हान आहे.असं असताना दुसऱ्या कसोटीतही बेन स्टोक्स काही खास करू शकला नाही. खरं तर संघाची नाजूक स्थिती असताना जो रूटसोबत मोठी भागीदारीची अपेक्षा होती. पण बेन स्टोक्सने एक चूक केली आणि थेट तंबूत परतावं लागलं. इंग्लंडच्या 4 विकेट पडल्यानंतर बेन स्टोक्स मैदानात आला होता. दोघांनी सावध खेळी केली आणि संघाला 200 पार नेलं. पण बेन स्टोक्सचा एक निर्णय महागात पडला. गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी बेन स्टोक्स धावचीत झाला. त्यामुळे इंग्लंड संघावर संकट ओढावलं. 63 वर्षानंतर इंग्लंड कर्णधार अशा पद्धतीने बाद झाला.
ब्रँडन डॉगेटच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड प्वॉइंटला मारून एक धाव घेण्यासाठी धावला. तेव्हा जो रूट काही तयार नव्हता. त्याने त्याला धाव घेण्यास मनाई केली. पण बेन स्टोक्स मध्यात आला होता. परत जाईपर्यंत त्याला विकेट देण्याशिवाय पर्याय नव्हता. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जोश इंग्लिशने या संधीचं सोनं केलं आणि थेट स्टंपवर चेंडू फेकला. त्याचा नेम अचूक लागला आणि स्टोक्सला तंबूत परण्याशिवाय पर्यायच उरला नाही. रिप्लेत पाहिलं असता ती धाव घेणं खरंच धोक्याचं होतं. त्याची शिक्षा स्टोक्सला मिळाली. जर रूट धावला असता तर कदाचित त्याची विकेट पडली असती.
JOSH INGLIS WOWEE WHAT A RUNOUT!#Ashes | #PlayoftheDay | @nrmainsurance pic.twitter.com/o7vTz12QRb
— cricket.com.au (@cricketcomau) December 4, 2025
बेन स्टोक्स धावचीत झाला आणि इंग्लंडला पाचवा धक्का बसला. यावेळी बेन स्टोक्सचा डाव अवघ्या 19 धावांवर आटोपला. स्टोक्सलाही त्याची चूक लक्षात आली पण त्यात खूप उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा कर्णधार बाद होण्याची घटना 63 वर्षानंतर घडली आहे. यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार टेड डेक्सटर 1962 मध्ये एशेज कसोटी धाव घेताना धावचीत झाला होता. इंग्लंडचा कर्णधार धावचीत होण्याची ही पाचवी वेळ आहे. बेन स्टोक्स, टेड डेक्सटर, फ्रेडरिक फेन आणि आर्ची मॅक्लारेन (दोन वेळा) धावचीत झाले आहेत.
