
टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वातील अंतिम फेरीत न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूते केलं. टीम इंडियाने यासह सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता पुन्हा द्विपक्षीय मालिकांचा थरार सुरु झाला आहे. अशात इंग्लंड एंड वेल्स क्रिकेट बोर्डातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाने त्यांच्या 17 खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे.
क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या प्रतिष्ठेच्या एशेज सीरिजमध्ये खेळलेल्या खेळाडूंवर कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेळाडूंना माध्यमांशी संवाद साधता येणार नाही. क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंवर माध्यामांसह बोलण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एशेज सीरिजचा भाग असलेल्या आणि वार्षिक करारप्राप्त खेळाडूंवर ही बंदी घातली आहे.
प्रतिष्ठेच्या एशेज सीरिजचं यंदा ऑस्ट्रेलियाचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंवर कारवाई का केली? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. एशेज सीरिजचा निकाल आणि त्यानंतर उद्भवलेला वाद यामुळे खेळाडूंवर माध्यमांसह संवाद साधण्याबाबत बंदी घातली असल्याचं म्हटलं जात आहे.
इंग्लंडची 2025-2026 मध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या एशेज सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा या 5 सामन्यांच्या मालिकेच एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.
इंग्लंडला या अशा लाजिरवाण्या मालिका पराभवाचा सामना करावा लागला. प्रचंड टीका सहन करावी लागली. याआधी इंग्लंड टीम न्यूझीलंड दौऱ्यावर होती. न्यूझीलंड दौऱ्यावर असताना इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याचा बाउन्सरसोबत वाद झाला होता. त्या प्रकरणात हॅकी ब्रूक याची चूक समोर आली होती.
दरम्यान एशेज सीरिजमध्ये बेन स्टोक्स याने इंग्लंडचं नेतृत्व केलं होतं. तर हॅरी ब्रूक याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या प्रतिष्ठेच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जेमी स्मिथ, जो रूट, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, मॅथ्यू फिशर, मॅथ्यू पॉट्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांचा समावेश होता.