AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England : श्रीलंकेविरुद्ध 10 वर्षांनंतर पराभव, इंग्लंडचा काही मिनिटातच मोठा निर्णय

Cricket : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. जाणून घ्या इंग्लंडने काय निर्णय घेतलाय?

England : श्रीलंकेविरुद्ध 10 वर्षांनंतर पराभव, इंग्लंडचा काही मिनिटातच मोठा निर्णय
ollie pope and pathum nissanka Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Sep 09, 2024 | 7:14 PM
Share

श्रीलंकेने इंग्लंडवर तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने यासह इंग्लंडला त्यांच्यात घरात 10 वर्षांनी पराभूत केलं. त्यामुळे इंग्लंडचं श्रीलंकेला क्लिन स्वीप करता आलं नाही. मात्र त्यानंतरही इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडवर टी 20I मालिकेत 3-0 अशा फरकाने मात केली. त्यानंतर आता इंग्लंड मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20 सीरिज एकूण 3 सामन्यांची असणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20I मालिकेला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 13 सप्टेंबरला पार पडेल. तर 15 तारखेला मालिकेची सांगता होईल.त्यानंतर 19 तारखेपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तर 29 सप्टेंबरला पाचवा आणि अंतिम सामना पार पडणार आहे. त्याआधी इंग्लंडने एकदिवसीय संघात एकमेव बदल केला आहे. इंग्लंडच्या गस एटकीन्सन याला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर एटकीन्सन याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

वनडे संघात एक बदल

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला सामना, बुधवार, 11 सप्टेंबर
  • दुसरा सामना, शुक्रवार, 13 सप्टेंबर
  • तिसरा सामना, रविवार, 15 सप्टेंबर

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला सामना, गुरुवार, 19 सप्टेंबर
  • दुसरा सामना, शनिवार, 21 सप्टेंबर
  • तिसरा सामना, मंगळवार, 24 सप्टेंबर
  • चौथा सामना, शुक्रवार, 27 सप्टेंबर
  • पाचवा सामना, रविवार, 29 सप्टेंबर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i सीरिजसाठी इंग्लंड टीम : फिल सॉल्ट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॅकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, साकिब महमूद, डॅन माउस्ली, जॅमी ओवर्टन, आदिल राशिद, रीसे टॉपली आणि जॉन टर्नर.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, ओली स्टोन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल राशिद, फिल साल्ट, जेमी स्मिथ, रीसे टॉप्ले आणि जॉन टर्नर.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.