फार्मासिस्‍ट होणार होता ‘हा’ खेळाडू, नंतर झाला दिग्गज यष्टीरक्षक

या क्रिकेटपटूने 34 कसोटी सामने आणि 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केले होते. अप्रतिम यष्टीरक्षणामुळे या खेळाडूला दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंगतीत स्थान आहे.

फार्मासिस्‍ट होणार होता 'हा' खेळाडू, नंतर झाला दिग्गज यष्टीरक्षक
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 4:10 PM

लंडन : क्रिकेटपटू होण्यापूर्वी बहुतेक खेळाडूंचा प्लान बी तयार असतोच. अनेकजण क्रिकेट सोडल्यानंतर आपल्याला एखादं दुसरं काम करतात. अशी अनेक क्रिकेटपटूंची उदाहरणं देखील आपल्या समोर  आहेत. असाच एक खेळाडू ज्याचं पहिलं प्रेम क्रिकेट नव्हतं, तर त्याला औषधांच्या दुनियेत अर्थात फार्मसी इंडस्ट्रीमध्ये (Pharmacy) मोठं नाव कमवायचं होत. पण नशीब त्याला थेट 22 यार्डाच्या दुनियेत म्हणजेच क्रिकेटमध्ये घेऊन आलं आणि तो क्रिकेटच्या दुनियेतील एक दिग्गज विकेटकीपर (Wicket Keeper) बनला. या खेळाडूच नाव गेरेंट जोन्स (Geraint Jones) असं असून आजच्याच दिवशी म्हणजले 14 जुलै, 1976 मध्ये त्याचा जन्म झाला होता.

जोन्सचा जन्म इंग्लंडच्या पापुआ न्‍यू गिनिया याठिकाणी झाला होता. त्याने इंग्‍लंड क्रिकेट टीममधून 10 एप्रिल 2004 रोजी सलामीचा सामना खेळला होता. 5 फीट 10 इंच उंचीचा जोन्स  सुरुवातीला क्रिकेटर नाही कर फार्मासिस्ट बनू इच्छित होता. त्याने ऑस्‍ट्रेलियामध्ये फार्मासिस्‍ट होण्याचा अभ्यासही सुरु केला होता. त्याच दरम्यान त्याला क्रिकेटची आवड निर्मान झाल्याने तो त्याचाही सराव करु लागला. तरीदेखील 27 वर्षाचा होईपर्यंत जोन्सला हवी ती संधी मिळाली नव्हती. अखेर इंग्‍लंड क्रिकेट टीमचे तत्‍कालीन प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची नजर जोन्सवर पडली आणि इंग्लंड संघाला दिग्गज विकेटकीपर एलेक स्‍टीवर्टच्या जागी नव्या दमाचा किपर भेटला.

अशी होती गेरेंट जोन्सची कारकीर्द

2004 साली वेस्‍टइंडीज संघाविरुद्ध डेब्‍यू केल्यानंतर जोन्स त्याच्या अप्रतिम यष्टीरक्षणामुळे पुढे इंग्लंड संघाकडून बरेच सामने खेळला. त्याने इंग्लंडकडून 34 टेस्‍ट सामने खेळले. ज्यात 23.91 च्या सरासरीने 1 हजार 172 रन्स केले. ज्यामध्ये्ए एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय यष्टीरक्षणात त्याने केवळ 34 टेस्टमध्ये 128 झेल झेॉलले आणि 5 स्‍टपिंगही केल्या. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता जोन्सने इंग्लंडकडून 51 वनडे सामन्यांत 24.62 च्या सरासरीने 862 रन्स केले. ज्यामध्ये  चार अर्धशतकांचा समावेश आहे. जोन्सने 2 टी-20 सामन्यांत 33 च्या सरासरीने 33 रन्सही केले. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जोन्सने 203 सामन्यांत 32.45 च्या सरासरीने 15 शतकं आणि 50 अर्धशतकं ठोकत 9 हजार 087 रन्स बनवले. तसेच 599 झेल झेलत 36 स्‍टपिंगही केल्या .

हे ही वाचा :

ICC WTC23 : वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक जाहिर, ‘असे’ असतील टीम इंडियाचे सामने

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटू सज्ज, सामन्यांपूर्वी ‘ही’ चाचणी अनिवार्य

Sourav Ganguly Biopic : लॉर्ड्सवर पुन्हा टी शर्ट भिरकावणार, दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?

(England Wicket Keeper Geraint Jones Born on this day Know Some Unknown Things About Him)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.