ENGW vs BANW Live Streaming : इंग्लंड विरुद्ध बांगलादेश भिडणार, सलग दुसरा सामना कोण जिंकणार?
England Women vs Bangladesh Women Womens World Cup 2025 Live Match Score : क्रिकेट चाहत्यांना मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात सलग दुसऱ्या विजयासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना कुठे होणार? जाणून घ्या.

आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील आठव्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहीमेतील दुसरा सामना असणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेश दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे आता उभयसंघात होणाऱ्या सामन्यात कोणता संघ सलग दुसरा विजय मिळवणार आणि कोणत्या संघाला पराभवाचा सामना करावा लागणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना केव्हा?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना मंगळवारी 7 ऑक्टोबरला होणार आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना कुठे?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
सलग दुसरा सामना कोण जिंकणार?
बांगलादेशने 2 ऑक्टोबरला पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने पाकिस्तानला 7 विकेट्सने धुळ चारली. तर 3 ऑक्टोबरला इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. दोन्ही संघांनी आपले पहिले सामने मोठ्या फरकाने जिंकले. त्यामुळे आता मंगळवारी चाहत्यांना उभयसंघात सलग दुसऱ्या सामन्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघ कुठे?
इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा +3.773 असा आहे. तर बांगलादेशचा नेट रनरेट हा +1.623 इतका आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकमेव सामना खेळवण्यात आला आहे. दोन्ही संघ 3 वर्षांपूर्वी 2022 साली वनडे वर्ल्ड कपनिमित्ताने पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. तेव्हा इंग्लंडने बांगलादेशवर 100 धावांनी मात केली होती. आता बांगलादेश या पराभवाची परतफेड करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
