AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENGW vs INDW : महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 38 धावांनी धुव्वा, 14 वर्षांआधीचा हिशोब चुकता

England Women vs India Women 1st T20I Match Result and Highlight : टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध विजयी सलामी देण्यासह खास कामगिरी करुन दाखवली आहे. जाणून घ्या टीम इंडियाने इंग्लंडचा कोणता हिशोब चुकता केला आहे.

ENGW vs INDW : महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 38 धावांनी धुव्वा, 14 वर्षांआधीचा हिशोब चुकता
Smriti Mandhana India Women Cricket TeamImage Credit source: @BCCIWomen X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 29, 2026 | 4:29 PM
Share

वुमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20i सामन्यात 38 धावांनी धु्व्वा उडवला आहे. टीम इंडियाने 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 150 रन्सवर रोखलं. इंग्लंडसाठी एमी जोन्स हीने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाने या विजयासह जुन्या हिशोबाची परतफेड केली. तसेच 4 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडत 1-0 अशी आघाडीही मिळवली. हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात हा विजयी धमाका केला. मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने विजयात दिलेल्या बहुमुल्य योगदानासाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

टीम इंडियाची बॅटिंग

इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 रन्स केल्या. महिला ब्रिगेडची अत्यंत वाईट सुरुवात झाली. स्मृती मंधाना डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाली. तर शफाली वर्मा हीने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे 1 ओव्हरनंतर 2 आऊट 7 रन्स अशी स्थिती झाली.

तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

त्यानंतर यास्तिका भाटीया आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी कमाल केली. यास्तिका आणि जेमिमाह या दोघींनी शतकी भागीदारी केली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 76 बॉलमध्ये 126 रन्सची पार्टनरशीप करुन टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. या दरम्यान दोघींनी वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. मात्र दोघी आऊट झाल्यानंतर दीप्ती शर्मा हीचा अपवाद वगळता लोअर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना काही करता आलं नाही.

जेमीमाहने 40 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 1 फोरसह 69 रन्स केल्या. तर यास्तिका भाटीया हीने 40 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारसह 54 धावांतं योगदान दिलं. तर दीप्तीने 22 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडसाठी लॉरेन बेल हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

इंग्लंडची बॅटिंग

इंग्लंडसाठी एमी जोन्स व्यतिरिक्त एकूण चौघींना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र त्यांना भारतीय गोलंदाजांपुढे तग धरता आला नाही. टीम इंडियासाठी डेब्युटंट नंदीनी शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. क्रांती गौड हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

इंग्लंडचा 14 वर्षांनंतर हिशोब

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडचा 14 वर्षांनी हिशोब केला. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाचा चेम्सफोर्डमधील काउंटी ग्राउंडमध्ये पराभव केला होता. भारताने त्यानंतर आता 2026 साली मिळालेल्या संधीचा फायदा घेत इंग्लंडला पराभूत करुन बरोबरी केली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा