AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : सर्वांच्या लाडक्या धोनीला मैदानावरच्या ‘त्या’ एका कृतीमुळे आज म्हटलं जातय स्वार्थी

IPL 2024 : एमएस धोनी चालू सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी शेवटच्या ओव्हर्समध्ये दमदार इनिंग खेळलाय. त्याने फोर-सिक्स ठोकून टीमला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलय. पंजाब किंग्स विरुद्ध मात्र धोनी असं करु शकला नाही. उलट मैदानावर त्याने असं काही केलं की, जे फॅन्सना नाही आवडलं.

IPL 2024 :  सर्वांच्या लाडक्या धोनीला मैदानावरच्या 'त्या' एका कृतीमुळे आज म्हटलं जातय स्वार्थी
MS Dhoni Image Credit source: PTI
| Updated on: May 02, 2024 | 8:09 AM
Share

चेन्नई सुपर किंग्सला IPL 2024 च्या सीजनमध्ये घरच्या मैदानावर आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. आधी लखनऊ सुपर जायंट्सने त्यांना हरवलं होतं. आता चेपॉक स्टेडियमवर पंजाब किंग्सने त्यांना धूळ चारली. यावेळी टीमचा माजी कर्णधार आणि सर्वात मोठा स्टार एमएस धोनीच्या डावाच्या अखेरीस फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला. टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या मॅचमध्ये असं काहीतरी घडलं की, त्यामुळे सोशल मीडियावर धोनीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. त्याला स्वार्थी ठरवलं जातय. पण मैदानात अखेर असं काय घडलं?.

यासाठी मॅचच्या पहिल्या डावात काय घडलं? ते तुम्हाला समजून घ्याव लागेल. चेन्नई सुपर किंग्सने पहिली बॅटिंग केली. अजिंक्य रहाणे आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाडने टीमला वेगवान स्टार्ट दिली. पण त्यानंतर डाव अडखळला. ऋतुराजने टीमला 150 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. तो 18 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यावेळी एमएस धोनीची मैदानावर एंट्री झाली. धोनी मैदानात होता. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्सना अखेरच्या 2 ओव्हर्समध्य धमाकेदार फिनिशिंगची अपेक्षा होती.

धोनीने या सीजनमध्ये किती धावा केल्या आहेत?

या सीजनमध्ये धोनी जेव्हा-जेव्हा मैदानावर उतरलाय, तेव्हा-तेव्हा त्याने फोर-सिक्स मारुन टीमला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलय. या सीजनमध्ये धोनीने आतापर्यंत 48 चेंडूत 9 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने 110 धावा केल्या आहेत. यावेळी असं होऊ शकलं नाही. 11 चेंडूत त्याने फक्त 14 धावा केल्या. पण शेवटच्या ओव्हरमध्ये असं काहीतरी घडलं की, ज्यामुळे मॅच पाहणारे हैराण झाले.

धोनीने असं काय केलं?

20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. चेंडू लॉन्ग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने गेला. फिल्डरने चेंडू रोखला. त्यावेळी धोनीसोबत बॅटिंग करणारा डॅरिल मिचेल रन्स घेण्यासाठी पळाला. तो दुसऱ्या टोकाला पोहोचला होता. पण त्याने पाहिलं की धोनी क्रीजमधून हललाच नाहीय. मिचेल पुन्हा माघारी पळून क्रीजमध्ये आला. म्हणजे मिचेलने जिथे धावून 2 रन्स पूर्ण केल्या, तिथे धोनी क्रीजमध्येच होता. चेन्नईच्या खात्यात 2 रन्स जमा होऊ शकले नाहीत.

फॅन्सना धोनीची कृती नाही आवडली

या मॅचआधी चालू सीजनमध्ये धोनीने 8 सिक्स मारल्या होत्या. तो मिचेलपेक्षा चांगला फिनिशर आहे, फॉर्ममध्ये आहे. पण मिचेलही एक दमदार फलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये त्याने हाफ सेंच्युरी झळकवली होती. धोनीने धाव घेण्यासाठी मिचेलला अशा प्रकारे मना करणं फॅन्सना नाही आवडलं. सोशल मीडियावर आता धोनीला स्वार्थी ठरवलं जातय.

धोनीने त्यानंतर काय केलं?

आता प्रश्न हा आहे की, धोनीने त्यानंतर काय केलं? चौथ्या चेंडूवर धोनी काही करु शकला नाही. पाचव्या चेंडूवर सिक्स मारला. शेवटच्या चेंडूवर धोनी 2 धावांसाठी पळाला, पण रनआऊट झाला. धोनीने 11 चेंडूत 14 धावा केल्या. चेन्नईच्या 162 धावा विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.