AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st ODI: Suryakumar Yadav पेक्षा चांगलं प्रदर्शन करणारा आजच्या मॅचमध्ये बेंचवर बसणार?

IND vs SL 1st ODI: सूर्यकुमारमुळे टीम इंडियाच्या बाहेर जाणारा तो प्लेयर कोण आहे? त्याची कामगिरी कशी आहे?

IND vs SL 1st ODI: Suryakumar Yadav पेक्षा चांगलं प्रदर्शन करणारा आजच्या मॅचमध्ये बेंचवर बसणार?
suryakumar-yadavImage Credit source: PTI
| Updated on: Jan 10, 2023 | 12:06 PM
Share

गुवाहाटी: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजपासून टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपची तयारी करणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. गुवाहाटी वनडेपासून वर्षातील पहिली वनडे सीरीज सुरु होत आहे. टीम इंडिया या मॅचसाठी आपली बेस्ट प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवेल. आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठले प्लेयर्स खेळणार हे महत्त्वाचं आहे. गुवाहाटी वनडेच्या प्लेइंग इलेव्हनवरुन पेच कायम आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेशासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरमध्ये तगडी स्पर्धा आहे.

सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, पण…..

सूर्यकुमार यादव सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या खेळाने सर्वांचच मन जिंकून घेतलय. टी 20 फॉर्मेटमध्ये या खेळाडून कमाल केलीय. श्रीलंकेविरुद्ध राजकोट येथे तिसऱ्या टी 20 मध्ये शतक ठोकून सूर्याने टीमला मालिका विजय मिळवून दिला. दुसऱ्याबाजूला श्रेयस अय्यर सुद्धा दमदार खेळतोय. त्यामुळे अय्यर आणि सूर्यकुमारमध्ये खेळणार कोण? हा प्रश्न निर्माण झालाय.

…मग एकावर अन्याय होईल

सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरमध्ये स्पर्धा यासाठी आहे, कारण, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी टीममध्ये पुनरागमन केलय. या तिघाचं खेळणं निश्चित आहे. शुभमन गिलला संधी देणार असल्याच रोहितने आधीच स्पष्ट केलय. तुमचे 4 बॅट्समन सेट आहेत. मग पाचव्या नंबरवर कोण येणार?. पाचव्या नंबरसाठी सूर्यकुमार आणि अय्यरमध्ये स्पर्धा आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. एकाला बाहेर बसवणं हा दुसऱ्या प्लेयरवर अन्याय ठरेल.

श्रेयस अय्यरने वनडेमध्ये दाखवला दम

श्रेयस अय्यरने मागच्यावर्षी वनडे फॉर्मेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 15 मॅचेसमध्ये 55.69 च्या सरासरीने 724 धावा फटकावल्या. अय्यरने एक शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली. अय्यरने आपलं बेस्ट प्रदर्शन केलय. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 बाहेर ठेवणं चुकीच ठरेल. सूर्यकुमारची कामगिरी कशी आहे?

दुसरीकडे वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमार यादवच प्रदर्शन खराब आहे. त्याने वर्ष 2022 मध्ये वनडेमध्ये 26 च्या सरासरीने 260 धावा केल्यात. सूर्यकुमारने फक्त एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे. फक्त तो टी 20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता रोहित शर्मा कोणाला संधी देतो, ते लवकरच समजेल.

Follow Us
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार