AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: आगामी टी20 विश्वचषकासाठीच्या टीम इंडिया जर्सीत रंगला बुर्ज खलिफा, ही रोषणाई एकदा पाहाच!

येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतासह सर्वच देशांनी आप आपले संघ जाहीर केले आहेत. आता भारताने या भव्य स्पर्धेसाठी आपली नवी जर्सीही सर्वांसमोर आणली आहे.

VIDEO: आगामी टी20 विश्वचषकासाठीच्या टीम इंडिया जर्सीत रंगला बुर्ज खलिफा, ही रोषणाई एकदा पाहाच!
भारतीय संघाची जर्सी बुर्ज खलिफावर
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 8:15 PM
Share

मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकाला (ICC T20 World Cup) सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले असून आता नव्याकोऱ्या जर्सीसही समोर आणल्या आहेत. टीम इंडियाही विश्व चषकात नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. नुकतेच संघातील खेळाडूंनी ही जर्सी घातलेले फोटोही बीसीसीआयने पोस्ट केले असून आता ही जर्सी दुबईची शान समजल्या जाणाऱ्या जगातील उंच आणि प्रशस्त इमारतींपैकी एक बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) ही झळकली.

अतिशय सुंदर अशा रोषणाईसोबत बुर्ज खलिफावर झळकलेल्या या जर्सीच्या सर्व रोषणाईचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमघ्ये लिहिलं आहे की ‘बिलियन चीयर्स जर्सी सर्वांसमोर सादर आहे. या जर्सीचा पॅटर्न हा संघाच्या करोडो चाहत्यांद्वारे संघाला केल्या जाणाऱ्या सपोर्टला दर्शवतो.’

बुर्ज खलीफावर झळकले भारतीय खेळाडू

भारताची ही नवी जर्सी बुर्ज खलिफावर झळकली, तेव्हा अप्रतिम अशी रोषणाई कऱण्यात आली होती. अवघा बुर्ज खलिफा भारताच्या जर्सीच्या रंगात न्हावून गेला. यावेळी भारताचे काही क्रिकेटरही इमारतीवर झळकले. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, बुमराह अशा काहींचा समावेश आहे. या सर्वांनी नवी जर्सी घातली असून ते जल्लोष करताना दिसत आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

T20 World Cup मधल्या सिक्सर किंग्सची यादी, टॉप 5 मध्ये भारताचा एकमेव खेळाडू

(For T20 World Cups Team India jersey displayed on burj khalifa with lightning)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.