AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji New Wineer : रणजीच्या ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी अनपेक्षित घडलयं; फायनलमध्ये ‘या’ टीमने केला मुंबईचा पराभव

मॅचच्या अखेरच्या दिवशी मंबईची दुसरी इनिंग ही 269 रन्सच्या स्कोअरवर संपली. त्यामुळे मध्यप्रदेशसमोर विजयासाठी 108 रन्सचे टार्गेट होते. केवळ चार क्रिकेटर्स गमावून त्यांनी हे लक्ष्य साध्य केले. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईने 374 रन्स केले होते. याला प्रत्युत्तर देत मध्यप्रदेशने पहिल्या इनिंगमध्ये 536 रन्सचा डोंगर उभा करत, 162 रन्सचा लिड घेतला होता.

Ranji New Wineer : रणजीच्या ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी अनपेक्षित घडलयं; फायनलमध्ये 'या' टीमने केला मुंबईचा पराभव
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 5:06 PM
Share

बंगळुरु – भारतातील सर्वात मोठ्या डोनेस्टिक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy)नवीन चॅम्पियन मिळालेला आहे. बंगळरुत खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये मध्यप्रदेशने (Madhya Pradesh), 42 वर्षे चॅम्पियन असलेल्या मुंबईच्या (Mumbai)टीमला 6 विकेट्सने पराभूत केले आहे. पहिल्यांदाच त्यांनी हा किताब आपल्या नावे केला आहे. पहिल्यांदाच देशात एक नवी चांगली टीम समोर आली आहे. हे सत्य यानिमित्ताने समोर आले आहे. 2014-15पासून आत्तापर्यंत 8 सीझनमध्ये 6 वेगवेगळ्या टीमने रणजीचा किताब आपल्या नावे केला आहे.

मॅचच्या अखेरच्या दिवशी मंबईची दुसरी इनिंग ही 269 रन्सच्या स्कोअरवर संपली. त्यामुळे मध्यप्रदेशसमोर विजयासाठी 108 रन्सचे टार्गेट होते. केवळ चार क्रिकेटर्स गमावून त्यांनी हे लक्ष्य साध्य केले. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईने 374 रन्स केले होते. याला प्रत्युत्तर देत मध्यप्रदेशने पहिल्या इनिंगमध्ये 536 रन्सचा डोंगर उभा करत, 162 रन्सचा लिड घेतला होता.

पहिल्या इनिंगमध्ये लीड घेतले आणि विजयही मिळवला

मध्य प्रदेशच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये शानजार 536 रन्स करत, आपला या रणजी चषकावरचा दावा आधीच मजबूत केला होता. नियमानुसार जर ही मॅच ड्रॉ झाली असती तरी पहिल्या इनिंगच्या रन्सच्या आधारावर मध्य प्रेशलाच विजयी घोषित करण्यात आले असते. मात्र मध्य प्रदेशच्या टीमने शेवटच्या दिवशी सात विकेट काढत, या विजयाचे आपण हक्कदार असल्याचे सिद्ध केले आहे.

तीन बॅट्समॅनची सेंच्युरी, बॉलर्सचीही चांगली कामगिरी

फायनलमध्ये मध्य प्रदेशच्या तीन बॅट्समननी कमाल केली. यात यश दुबे (133), शुभम शर्मा (116) आणि रजत पाटीदार (122) यांचा समावेश आहे. तर बॉलर्समध्ये गौतम यादव याने 6 विकेट्स काढल्या. कुमार कार्तिकेयने 5 विकेट्स कमावल्या. इतर बॉलर्सनींही चांगली साथ दिली.

मुंबई टीमसमोर आव्हान उभे केले.

मुंबईच्या पहिल्या इनिंगमधीलर 374 स्कोअरला उत्तर देताना मध्यप्रदेशने चांगली धावसंख्या उभारली. दुसऱ्या विकेटसाठी शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी 222 रन्सची पार्टनरशीप केली. मुंबईकडून तुषार देशपांडेने 3 विकेट्स आणि सम्स मुलानी याने पाच विकेट्स घेतल्या. तर मोहित अवस्थीला दोन विकेट मिळाल्या.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.