Asia cup 2022: ‘तुलना करायची असेल, तर….’ सौरव गांगुलीच विराट कोहलीबद्दल विधान
Asia cup 2022: भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने अखेर शतक झळकावलं. आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटमधून हे शतक निघालं. मागच्या अडीच वर्षापासून चाहते विराटच्या या शतकाची प्रतिक्षा करत होते.

मुंबई: भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने अखेर शतक झळकावलं. आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटमधून हे शतक निघालं. मागच्या अडीच वर्षापासून चाहते विराटच्या या शतकाची प्रतिक्षा करत होते. अखेर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटने तुफान बॅटिंग केली. 61 चेंडूत त्याने नाबाद 122 धावा फटकावल्या. महत्त्वाचं म्हणजे विराटने ही सेंच्युरी टी 20 या छोट्या फॉर्मेटमध्ये झळकवली.
मोठा दिलासा मिळाला
या शतकाने विराटच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. बऱ्याच अवधीपासून फॅन्स विराट फॉर्ममध्ये यावा, यासाठी प्रार्थना करत होते. या सेंच्युरीने टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत. माजी भारतीय कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सुद्धा विराटच्या शतकाने खूश आहेत.
मतभेद असल्याच्या बातम्या आल्या
मागच्या काही महिन्यात विराट कोहली आणि सौरव गांगुलीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या. गांगुलीला कोहलीबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने कोहली माझ्यापेक्षाही चांगला खेळाडू असल्याच त्यांनी मान्य केलं.
तुलना करायची असेल, तर….
सौरव गांगुलीला कोहलीच्या आक्रमक वर्तनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, “तुलना करायची असेल, तर खेळण्याचं कौशल्य, प्रतिभा याची झाली पाहिजे” “मला वाटतं, माझ्यापेक्षा तो चांगला खेळाडू आहे. आम्ही दोघे वेग-वेगळ्या समयी खेळलो आहोत. मी माझी वेळ असताना, अनेक सामने खेळलो. तो आता खेळतोय, पुढेही खेळेल. सध्या त्याने माझ्यापेक्षा कमी सामने खेळले आहेत, पण मला ठाऊक आहे, तो माझ्यापेक्षा पुढे जाईल. तो शानदार खेळाडू आहे” अशा शब्दात गांगुलीने कोहलीचं कौतुक केलं.
