“देव जेव्हा अक्कल वाटत होता, तेव्हा…”, माजी क्रिकेटपटूची कोच राहुल द्रविडवर बोचरी टीका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवसावरही तसं पाहिलं ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं. मजबूत आघाडीमुळे आता भारतासमोर खडतर आव्हान असणार आहे. त्यामुळे कसोटी वाचवणं हीच परीक्षा असणार आहे.

देव जेव्हा अक्कल वाटत होता, तेव्हा..., माजी क्रिकेटपटूची कोच राहुल द्रविडवर बोचरी टीका
राहुल द्रविडच्या कोचिंगवर नको ते पण ते पण टीका करायला लागले, माजी काय क्रिकेटपटू काय म्हणाला? वाचाImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 2:11 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल जिंकला आणि भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर संघात आर. अश्विनला स्थान न दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या दोन निर्णयावर माजी क्रिकेटपटूंनी टीकास्त्र सोडलं. त्याचे परिणाम पहिल्या दोन दिवसात दिसून आले. एकीकडे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला. दुसरीकडे, भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर नांगी टाकली. अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर आणि रवींद्र जडेजा यांनी थोडी फार लाज राखली खरी. पण ऑस्ट्रेलियाकडे असलेली आघाडी पाहता काय खरं नाही असंच म्हणावं लागेल. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू बासित अलीने भारतीय संघ व्यवस्थापनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल द्रविड सर्वात कमकुवत प्रशिक्षक असल्याचं त्याने सांगितलं.

“मी राहुल द्रविडचा मोठा फॅन आहे आणि कायम राहणार. तो एक क्लास प्लेयर आणि लिजेंड आहे. पण प्रशिक्षक म्हणून पूर्णपणे झिरो आहे. तुम्ही भारतात टर्निंग खेळपट्टी तयार केली. मग मला एकच उत्तर द्या. जेव्हा भारताने ऑस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा समान विकेट होती का? त्यांच्याकडे बाउंस असलेली खेळपट्टी होती ना? मग देव जाणे नेमका काय विचार करत होता. जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा मला वाटते डोंगरापाठी लपला होता.”, असं बासित अलीने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं.

“भारताने पहिल्या दोन तासातच सामना गमावला होता. पहिल्या दोन तासात प्रेशरमध्ये गोलंदाजी केली. गोलंदाजी पाहता आयपीएल असल्यासारखं वाटतं होतं. पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत भारतीय गोलंदाज इतके खूश होते की त्यांनी सामना जिंकला. आता भारताला स्वस्तात बाद होतील अशी अपेक्षा आहे. तसेच चौथ्या डावात चमत्काराची अपेक्षा आहे. 120 षटकात फिल्डिंग करताना 2-3 खेळाडू फिट वाटले. रहाणे, कोहली आणि जडेजा वगळता इतर खेळाडू थकलेले वाटले.”, असंही त्याने पुढे सांगितलं.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या. त्यानंतर भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात 4 गडी गमवून 123 धावा केल्या त्यामुळे आता कांगारुंकडे 296 धावा आहेत. चौथ्या दिवसात यात आणखी भर पडेल आणि मोठं आव्हान भारतासमोर असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.