AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आधी जीव वाचवा मग क्रिकेट खेळत बसा”, PSL स्पर्धेवरून जावेद मियाँदाद संतापला

संपूर्ण जग कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठप्प झालं आहे. मात्र पीसीबी पाकिस्तान क्रिकेट लीगच्या 6 व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे आयोजनाच्या विचारात आहे. या वरुन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने (Javed Miandad) पीसीबीला (PCB) घरचा आहेर दिला आहे.

आधी जीव वाचवा मग क्रिकेट खेळत बसा, PSL स्पर्धेवरून जावेद मियाँदाद संतापला
Javed Miandad
| Updated on: May 11, 2021 | 8:52 PM
Share

इस्लामाबाद : पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) 6 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांच्या आयोजनावरुन माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने (Javed Miandad) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) घरचा आहेर दिला आहे. पीसीएलच्या आयोजनावरुन मियाँदादने विरोध दर्शवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्च महिन्यात 5 सामन्यांनंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान आता ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यासाठी पीसीबी प्रयत्नशील आहे. यावरुन मियाँदादने निशाणा साधला आहे. (Former Pakistan cricketer Javed Miandad opposes psl cricket tournamemt due to corona)

मियांदाद काय म्हणाला?

“सध्या सारं जग कोरोना विरुद्ध लढा देत आहे. त्यामुळे आपण सध्या पीसीएलऐवजी कोरोना या वैश्विक महामारी विरुद्ध लढायला हवं. ही वेळ क्रिकेट खेळायची नसून जीव वाचवाण्याची आहे. आपण सर्वांच्या जीवाची काळजी घ्यायला हवी. जगावर कोरोनाचं सावट आहे. भारतात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. तिथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे”, असं मियाँदादने स्पष्ट केलं.

“कोणाला काही झाल्यास जबाबदार कोण?”

“पीसीबी आर्थिक फायद्यासाठी या स्पर्धेंचं आयोजन करत असेल तर हे अयोग्य आहे. जर हे सर्व माझ्या हाती असतं तर मी इतकी मोठी जोखीम घेतली नसती. पीसीबीने जर या स्पर्धेचं आयोजन केलं अन कोणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण”, असा प्रश्नही मियाँदादने यावेळेस उपस्थित केला.

जूनपासून स्पर्धेला पुन्हा सुरुवात?

मीडिया रिपोर्टनुसार, पीसीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे 1 जूनपासून करण्यात येऊ शकते. हे सामने यूएईमध्ये खेळवण्यात येऊ शकतात. दरम्यान काही कारणांमुळे या स्पर्धेचं जूनमध्ये आयोजन न झाल्यास स्पर्धा रद्द करावी लागले, याबाबतची माहिती पीसीबीने सर्व फ्रँचायजींना दिली आहे.

आयपीएलचा 14 वं पर्व स्थगित

दरम्यान कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी आयपीएलचा 14 मोसम स्थगित करण्यात आला. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत होता. मात्र त्यानंतरही सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन सामने खेळवण्यात येत होते. मात्र त्यानंतरही बायो-बबलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. अनेक खेळाडू पॉझिटिव्ह झाले. त्यामुळे बीसीसीआयने 4 मे ला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या :

World Test Championship | हिटमॅन रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये किर्तीमान करण्याची संधी

India Tour Sri Lanka 2021 | टीम इंडियाचे ‘हे’ 20 युवा शिलेदार श्रीलंकेत मैदान मारणार?

(Former Pakistan cricketer Javed Miandad opposes psl cricket tournamemt due to corona)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.