Kamran Akmal : ‘लाज वाटू दे’ असं हरभजनने सुनावल्यानंतर कामरान अकमल आला वठणीवर, मागितली माफी

Kamran Akmal : भारत-पाकिस्तान सामन्यात रविवारी अर्शदीप सिंग शेवटची ओव्हर टाकत होता. त्यावेळी धर्मावरुन कामरान अकमलने वादग्रस्त भाष्य केलं. हे वक्तव्य कामरानवर लगेच उलटलं. त्याला त्याची किंमत चुकवावी लागली.

Kamran Akmal : 'लाज वाटू दे'  असं हरभजनने सुनावल्यानंतर कामरान अकमल आला वठणीवर, मागितली माफी
Kamran Akmal-Harbhajan Singh
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:43 AM

पाकिस्तानाच माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने जाहीररित्या माफी मागितली आहे. त्याने भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. ARY न्यूजवर बोलताना कामरान अकमलने असभ्य भाषा केली होती. अयोग्य टिप्पणी केली होती. त्यावरुन मोठा गदारोळ झाला. अनेकांनी त्यावर मत नोंदवली. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने यावर नाराजी व्यक्त केली. त्याने स्पष्ट शब्दात कामरान अकमलला सुनावलं. भारत-पाकिस्तान सामन्यात रविवारी अर्शदीप सिंग शेवटची ओव्हर टाकत होता. त्यावेळी धर्मावरुन कामरान अकमलने वादग्रस्त भाष्य केलं. हे वक्तव्य कामरानवर लगेच उलटलं. त्याला त्याची किंमत चुकवावी लागली.

‘काहीही होऊ शकतं. 12 वाजलेत’ असं कामरान अकमल म्हणाला. हरभजन सिंगने तो व्हिडिओ रिपोस्ट करत त्याला चांगलच सुनावलं. शीख समाजाबद्दल कामरान अकमलने अपमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे हरभजन सिंगच खवळण स्वाभाविक आहे. आपलेच शब्द आपल्यावर उलटल्यानंतर कामरान अकमलने X वरुन माफी मागितली. “मी जे वक्तव्य केलं, त्याबद्दल मला खेद आहे. हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मी माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. जगभरातील शिखांबद्दल मला प्रचंड आदर आहे. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मनापासून माफी मागतो” असं कामरान अकमलने म्हटलय.

हरभजनने काय म्हटलं ?

“लाज आहे तुझी, घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी इतिहास जाणून घ्या. आम्ही शिखांनी तुमच्या आई-बहिणींचा अपहरणकर्त्यांकडून बचाव केला. वेळ 12 वाजताची होती. लाज वाटली पाहिजे… थोडी कृतज्ञता दाखवा”, अशा शब्दात हरभजनने कामरानला सुनावलं आहे.

कामरान अकमल काय म्हणालेला?

“अर्शदीप सिंह याला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तसा तो रंगात दिसत नाही. तुम्हाला माहित आहे 12 वाजले आहेत” यानंतर कामरान हसतो. कामरानसह असलेले इतर एक्सपर्ट्स म्हणतात, “कुणा शिखाला 12 वाजता द्यायला नको” हरभजनने या मुद्दयावरुन संताप व्यक्त करत कामरानची लाज काढली आहे

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.