AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Gautam Gambhir ने विराट कोहलीसोबत झालेल्या भांडणावर अखेर सोडलं मौन

IPL 2023 : Gautam Gambhir आता या संपूर्ण विषयावर बोलला आहे. गौतम गंभीरने त्याचं विराट आणि धोनीसोबत कसं नात आहे? याबद्दलही सांगितलं. क्रिकेटच्या मैदानात गंभीर आणि विराट भिडण्याची ती पहिली वेळ नव्हती.

IPL 2023 : Gautam Gambhir ने विराट कोहलीसोबत झालेल्या भांडणावर अखेर सोडलं मौन
Virat Kohli And Gautam Gambhir
| Updated on: Jun 12, 2023 | 3:38 PM
Share

नवी दिल्ली : IPL 2023 चा सीजन मागच्या महिन्यात संपला. क्रिकेट बरोबरच वादांमुळे हा सीजन जास्त लक्षात राहील. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना मैदानात मोठं भांडण पहायला मिळालं. भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे स्टार विराट कोहली आणि गौतम गंभीर परस्परांना भिडले होते. मैदानातील ही लढाई पुढे सोशल मीडियावर गेली. आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात वादाची ती दुश्य कायम आहेत.

नेमका या दोघांमध्ये कशावरुन वाद झाला होता? हा आजही क्रिकेट रसिकांना पडलेला प्रश्न आहे. आता गौतम गंभीरने या संपूर्ण विषयावर मौन सोडलं आहे.

गौतम गंभीरने या वादावर काय सांगितलं?

गौतम गंभीरने त्यावेळी काय घडलं? आता काय भावना आहेत? त्या बद्दल सांगितलं. ते भांडण फक्त मैदानापुरत मर्यादीत होतं, असं गौतम गंभीरने सांगितलं. मॅचमध्ये याआधी सुद्धा असं घडलय. मी योग्य माणसाला साथ दिली, असं गौतम गंभीरच म्हणणं आहे. नवीन उल हकने काही चुकीच केलं नाहीय. मी नेहमीच योग्य माणसाच्या बाजूने उभा राहतो, असं गौतम गंभीरने सांगितलं.

तू नवीन उल हकची बाजू घेतली, असं अनेक जण मला म्हणाले, पण….

न्यूज 18 हिंदीवर गौतम गंभीर बोलत होता. शेवटच्या श्वासापर्यंत योग्य माणसाला साथ देत राहीन, असं गंभीर म्हणाला. आपल्या देशाच्या खेळाडूची साथ देण्याऐवजी तू नवीन उल हकची बाजू घेतली, असं अनेक जण मला म्हणाले. पण गंभीरच्या मते, जर त्याच्या टीमचा खेळाडू चुकीचा नसेल, तर तो त्याच्यासोबत उभा राहणार. मग भले, तो कुठल्याही देशाचा असू दे.

व्यक्तीगत जीवनात भांडणाच किती महत्व?

मॅचनंतर विराट कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये भांडण झालं. तिन्ही खेळाडूंवर सामन्यानंतर दंडात्मक कारवाई झाली. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात याआधी सुद्धा आयपीएलमध्ये भांडण झालय. त्यावेळी गंभीर केकेआरचा कॅप्टन होता. मैदानात होणाऱ्या भांडणांना व्यक्तीगत जीवनात महत्व देत नाही, असं गौतम गंभीरने सांगितलं. विराट-धोनीसोबतच्या नात्यावर बोलला गंभीर

गौतम गंभीरने धोनी आणि विराट कोहलीसोबत असलेल्या नात्यावर सुद्धा भाष्य केलय. धोनी आणि विराट सोबत एकसारखेच संबंध असल्याच गौतमने सांगितलं. कोहलीने देशासाटी जे केलय, त्याचा मी सम्मान करतो, असं गंभीर म्हणाला. क्रिकेट म्हणजे टीम गेम आहे. इथे तुम्ही एका खेळाडूमुळे मॅच जिंकत नाहीत, याकडे गंभीरने लक्ष वेधलं. 2007 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकण्यात युवराज सिंगची महत्वाची भूमिका होती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.