सचिनसोबत कसोटी पदार्पण, वयाच्या 28 वर्षी क्रिकेटला रामराम, ‘या’ खेळाडूला वाढदिवशीच कोरोनाची लागण

या खेळाडूने टीम इंडियाकडून खेळताना एकूण 20 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:50 PM, 1 Mar 2021
सचिनसोबत कसोटी पदार्पण, वयाच्या 28 वर्षी क्रिकेटला रामराम, 'या' खेळाडूला वाढदिवशीच कोरोनाची लागण
या खेळाडूने टीम इंडियाकडून खेळताना एकूण 20 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत

मुंबई : देशासह राज्यात (Maharashtra) कोरोना (Coroana) डोकं वर काढत आहे. दररोज राज्यात काही हजारोंमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (mumbai cricket association) निवड समितीचे प्रमखु, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता असलेला सलिल अंकोला (Salil Ankola) याला कोरोनाची लागण झाली आहे. अंकोल यांनी इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. दुर्देवाची बाब म्हणजे अंकोला यांना रविवारी कोरोना झाला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांचा वाढदिवस हा रुग्णालयातच साजरा करावा लागणार आहे. (former team india cricketer salil ankola tested corona positive)

 

 

View this post on Instagram

A post shared by Salil Ankola (@salilankola)

 

“माझा उद्या वाढदिवस आहे आणि कोरोना झाला आहे. हा वाढदिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असेल. कोरोनाची लागण झाल्याने मला भिती वाटत आहे. माझ्या लवकर बरा होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. मी लवकरच कोरोनावर मात करत परतेन”, अशा आशावाद अंकोलाने व्यक्त केला.

सचिनसोबत कसोटी पदार्पण

अंकोला यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरसोबत पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं होतं. हा सामना अंकोलाच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा ठरला. त्यानंतर अंकोलाला टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच अंकोलाने भारताकडून खेळताना 20 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. अंकोलाने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना 13 फेब्रुवारी 1997 ला खेळला होता.

अनेक मालिकांमध्ये भूमिका

क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर अंकोलाने काही मालिकांमध्ये काम केलं. त्याने ‘विकराल गबराल’, आणि ‘श्हहह कोई है’ या मालिकांमध्ये आपल्या अभियनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर अंकोला बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता. यानंतर डिसेंबर 2020 मध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. आता अंकोला मुंबई क्रिकेट टीमचे निवडकर्ता आहेत.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

संबंधित बातम्या :

New Zealand vs Australia | ऑकलंडमधील लॉकडाऊनचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेवर परिणाम, सामन्यांच्या ठिकाणात बदल

India vs England T 20 Series | फिटनेस टेस्टमध्ये अनफिट, ‘या’ खेळाडूला टीम इंडियामधून डच्चू मिळण्याची शक्यता

PM Narendra Modi | दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

(former team india cricketer salil ankola tested corona positive)