AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Zealand vs Australia | ऑकलंडमधील लॉकडाऊनचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेवर परिणाम, सामन्यांच्या ठिकाणात बदल

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या मालिकेत उभय संघात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे.

New Zealand vs Australia | ऑकलंडमधील लॉकडाऊनचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेवर परिणाम, सामन्यांच्या ठिकाणात बदल
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या मालिकेत उभय संघात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे.
| Updated on: Mar 01, 2021 | 1:03 PM
Share

ऑकलंड : न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरातील ऑकलंडमध्ये (Auckland) कोरोनाने (Corona) डोकं वर काढलं आहे. यामुळे ऑकलंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown Ind Auckland) करण्यात आलं आहे. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याचा फटका न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेवर (New Zealand vs Australia) झाला आहे. (due to lockdown in auckland has changed the venue for 4th and 5th T20 matches between New Zealand and Australia)

ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील 2 सामने खेळण्यात आले आहेत. या दोन्ही मॅचमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. दरम्यान लॉकडाऊन लागल्याने उभय संघातील चौथ्या आणि पाचव्या सामन्याचं ठिकाण बदण्यात आलं आहे.

लॉकडाउनमुळे चौथा आणि पाचवा सामना वेलिंग्टनमध्ये

लॉकडाऊनमुळे आता न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि पाचवा टी 20 सामन्यांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. यामुळे आता चौथा आणि पाचवा सामना वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेता येणार नाही, याबाबतची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 1 मार्चला दिली. याआधी या चौथ्या आणि पाचव्या सामन्याचे आयोजन हे ऑकलंड आणि माउंट मांगुनईमध्ये करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियाकडून निर्णयाचं स्वागत

न्यूझीलंड क्रिकेटच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियच्या खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक योग्य निर्णय आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं स्पिनर अ‍ॅस्टन एगर म्हणाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वेलिंग्टनमध्ये सराव सुरू केला आहे. उभय संघात मालिकेतील तिसरा सामना 3 मार्चला खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर चौथा सामना 5 तर पाचवा आणि शेवटचा सामना हा 7 मार्चला खेळण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाला तिसरा सामना जिंकणं आवश्यक

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला टी 20 सामना 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या मॅचमध्ये किवींनी 53 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. आता ऑस्ट्रेलियाला मालिकेत कमबॅक करायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत तिसरा सामना जिंकला पाहिजे. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना गमावल्यास त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल.

टी 20 मालिकेचे सुधारित वेळापत्रक

पहिला सामना, 22 फेब्रुवारी, ख्राईस्टचर्च

दुसरा सामना, 25 फेब्रुवारी, डुनेडिन

तिसरा सामना, 3 मार्च, वेलिंग्टन

चौथा सामना, 5 मार्च, वेलिंग्टन

पाचवा सामना, 7 मार्च, वेलिंग्टन

न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, एश्टन एगर, जेसन बेहरेनडॉर्फ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमोट, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तनवीर संघा, डी आर्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, एंड्रयू टाय आणि एडम झॅम्पा.

संबंधित बातम्या :

Australia Tour South Africa 2021 | भारताविरुद्धच्या कामगिरीचा फटका, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता

India vs England T 20 Series | फिटनेस टेस्टमध्ये अनफिट, ‘या’ खेळाडूला टीम इंडियामधून डच्चू मिळण्याची शक्यता

(due to lockdown in auckland has changed the venue for 4th and 5th T20 matches between New Zealand and Australia)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.