IPL 2022: गंभीरचे धोनीबद्दल हृदयस्पर्शी शब्द, वाचा LGS च्या विजयानंतर गौतमने काय म्हटलं…

LSG च्या विजयावर गौतम गंभीरने दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेशिवाय अनेक गोष्टी कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ज्यामध्ये धोनी आणि गंभीरच्या भेटीची दृष्यदेखील होती. हे क्षण पाहून दोघांचेही चाहते सुखावले असतील.

IPL 2022: गंभीरचे धोनीबद्दल हृदयस्पर्शी शब्द, वाचा LGS च्या विजयानंतर गौतमने काय म्हटलं...
Gautam Gambhir, MS DhoniImage Credit source: INSTAGRAM / Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 10:59 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या सीझनमध्ये, गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा एक हाय स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये लखनौ संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस आणि आयुष बदोनी लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या जोडीने केली होती. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौसमोर 210 धावांचा डोंगर उभा केला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार करण कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने 6 विकेट आणि 2 चेंडू राखून हे लक्ष्य पार केलं. दरम्यान, या सामन्यानंतर लखनौ संघाचा मेन्टॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS DHoni) या दोघांची मैदानात भेट झाली. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. या भेटीची दृष्य भारतीय क्रिकेटरसिकांना सुखावणारी होती.

आयपीएल 2022 मधील लखनौच्या पहिल्या विजयानंतर गंभीरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. विजयावर गंभीरच्या पहिल्या प्रतिक्रियेशिवाय, बरंच काही कॅमेऱ्यात कैद झालं आहे, ज्यामध्ये धोनी आणि गौतम गंभीरची भेटदेखील होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यासोबतच गौतम गंभीरनेही त्याच्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे.

LSG च्या विजयानंतर गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल

लखनौ सुपर जायंट्सच्या विजयानंतर गौतम गंभीरची विजयी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची प्रतिक्रिया उत्साहाने भरलेल्या तरुण क्रिकेटपटूपेक्षा कमी नव्हती. सोशल मीडियावर काहीजण म्हणतायत की, हा सामना लखनौ विरुद्ध चेन्नई असा नव्हता, तर तो धोनी विरुद्ध गंभीर असा होता.

धोनीसोबतच्या भेटीवर गंभीरची प्रतिक्रिया…

या प्रतिक्रियेनंतर गौतम गंभीरही एमएस धोनीशी बोलताना दिसला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती, ज्याचे फोटो मैदानावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले. काहीच क्षणात ही दृष्य हेडलाईन्स बनली. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट करताना गौतम गंभीरने या फोटोंना कॅप्शन दिले आहे की, ‘कर्णधाराला भेटून आनंद झाला.’

इतर बातम्या

IPL 2022 points table मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

KKR vs PBKS, IPL 2022 Match Prediction: स्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ KKR वर भारी पडणार? आजची मॅच कोण जिंकणार?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.