AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी, 2 खेळाडूंना लॉटरी

टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरत आपल्यावरील चोकर्सचा डाग लागू दिला नाही. भारतीय चाहत्यांनी दमदार स्वागत करत खेळाडूंना त्यांनी काय केलंय हे आपल्या उपस्थितीने दाखवून दिलं. अशातच दोन खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आली आहे.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी, 2 खेळाडूंना लॉटरी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 04, 2024 | 10:43 PM
Share

वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाचं मायदेशी जंगी स्वागत करण्यात आलं. समुद्राच्या बाजूला चाहत्यांनी आपल्या उपस्थितीने महासागर उभा केला होता. वानखेडे स्टेडियमपर्यंत जाताना चाहते आणि टीममधील खेळाडू सर्वांनी विजयी रॅलीमध्ये आनंद घेतला. भारताच्या चाहत्यांना आयसीसीच्या ट्रॉफीसाठी 11 वर्षे वाट पाहावी लागली होती. अखेर भारताच्या चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली असून असून आता भारताकडेही आयसीसी ट्रॉफी आली आहे. टीम इंडियाचं कशा प्रकारे स्वागत झालं हे संपूर्ण जगाने आता पाहिलं असेल. टीम इंडियाचा एकदा नाहीतर दोनवेळा तोंडचा घास पळवल्यासारखं झालं होतं. मात्र रोहित अँड कंपनीने टी-20 वर्ल्ड कपसारखी नामी संधी गमावली नाही. अशातच आयसीसीनेही एक आनंदाची बातमी दिली आहे.

आयसीसीने मोठी घोषणा केली असून या पुरस्कारासाठी दोन खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. आयसीसीने ‘प्लेयर ऑफ द मंथ’ साठी टीम इंडियाचे दोन आणि अफगाणिस्तान संघातील एका खेळाडूची निवड केलीये. यातील भारताचे ते दोन खेळाडू म्हणजे यॉर्कर किंग ओळखला जाणार जसप्रीत बुमराह आहे. तर दुसरा खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा असून तिसरा खेळाडू रहमानउल्ला गुरबाज आहे.

आयसीसीने या तिघांची निवड करण्यामागे त्या दर्जाची कामगिरी या तिन्ही मागील महिन्यातील खेळाडूंनी केलीये. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा रहमानउल्ला गुरबाज याने केल्या आहेत. गुरबाजने 8 सामन्यात 35.12 च्या सरासरीने आणि 124.33 च्या स्ट्राइक रेटने एकूण 281 धावा केल्या. त्यापाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा असून त्याने सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.  रोहितने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

रोहितने 36.71 सरासरी तर 156.7 स्ट्राइक रेटने 257 धावा केल्या. सुपर-८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती, तर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 57 धावांची खेळी केली होती. त्यामुळे टीम इंडियाचा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. तिसरा खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह आहे. टीम इंडियाकडून गोलंदाजीमध्ये सर्वात आव्हानात्मक गोलंदाज बुमराह राहिला आहे. बुमराहने 8.26 च्या सरासरीने एकूण 15 विकेट घेतल्या आणि संपूर्ण स्पर्धेत 4.17 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या. यामधील कोणत्या खेळाडूची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...