AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Health: मोठा निर्णय! BCCI ऋषभला देणाऱ्या पैशांचा आकडा पाहून विस्फारतील डोळे!

Rishabh Pant Health: ऋषभवर नुकतीच शस्त्रक्रिया झालीय. BCCI ऋषभला हे पैसे का देणार? आणि किती कोटी देणार?

Rishabh Pant Health: मोठा निर्णय! BCCI ऋषभला देणाऱ्या पैशांचा आकडा पाहून विस्फारतील डोळे!
rishabh pantImage Credit source: twitter
| Updated on: Jan 08, 2023 | 10:46 AM
Share

मुंबई: सध्या ऋषभ पंत मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. मागच्यावर्षी 30 डिसेंबरला दिल्लीहून रुडकी येथे जात असताना ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. पण त्याला बराच मार लागला. आधी ऋषभवर डेहराडूनच्या रुग्णालायत उपचार झाले. त्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी मुंबईला शिफ्ट करण्यात आलं. सध्या ऋषभ मुंबईच्या किकोलाबेन रुग्णालयात आहे. नुकतीच त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. सध्याचा काळ ऋषभसाठी कठीण आहे. या खडतर वेळेत भारतीय क्रिकेट बोर्ड ऋषभच्या पाठिशी भक्कमपणे उभं आहे.

ऋषभ पंतला BCCI कडून किती कोटी मिळणार?

BCCI फक्त ऋषभच्या वैद्यकीय गरजांचीच काळजी घेत नाहीय, तर त्याच व्यावसायिक हितही लक्षात घेऊन मदत करतय. ऋषभ पंत यावर्षी आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. तो पर्यंत, ऋषभ फिट होईल अशी अपेक्षा नाहीय. ऋषभ दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 16 कोटी रुपये मिळणार होते. ही रक्कम आता बोर्डाकडून ऋषभला देण्यात येईल. त्याशिवाय बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील 5 कोटी रुपये देईल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. पुढचे 6 महिने, तरी ऋषभ मैदानावर दिसणार नाहीय.

नियम काय आहे?

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सेंट्रल काँट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंचा विमा उतरवला जातो. बीसीसीआयच्या नियमांनुसार, या खेळाडूंना दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडावं लागल्यास बोर्डाकडून त्यांना पूर्ण मोबदला दिला जातो. संबंधित फ्रँचाइझी नाही तर विमा कंपनी त्यांचा संपूर्ण बिल देते.

ऑपरेशन यशस्वी

ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शुक्रवारी संध्याकाळी सर्जरी झाली. ऋषभच्या लिगामेंटला मार लागलाय. पंतच्या गुडघ्यावर तब्बल 3 तास ऑपरेशन सुरु होतं. ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. फक्त आयपीएलच नाही, तर…

ऋषभ पंत फक्त आयपीएल 2023 ला च मुकणार नाहीय, तर सप्टेंबरमध्ये होणारा आशिया कप आणि ऑक्टो-नोव्हेंबरमधील आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये सुद्धा कदाचित खेळू शकणार नाही.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.