GT vs RR, IPL 2022, qualifier-1: बटलर-संजूने गुजरातची गोलंदाजी कशी फोडून काढली, त्या कडक इनिंगचे VIDEO पहा

| Updated on: May 24, 2022 | 10:01 PM

GT vs RR, IPL 2022, qualifier-1: जोस बटलरने आज सावध सुरुवात केली. त्याने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला नाही. आधी त्याने संयमाने फलंदाजी केली. पण खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर त्याने आपला आक्रमक अंदाज दाखवला.

GT vs RR, IPL 2022, qualifier-1: बटलर-संजूने गुजरातची गोलंदाजी कशी फोडून काढली, त्या कडक इनिंगचे VIDEO पहा
jos buttler-sanju samson
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: IPL 2022 मध्ये प्लेऑफचा पहिला सामना सुरु आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) हे दोन संघ आमने-सामने आहेत. कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. हार्दिक पंड्याने (Hardik pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या 3 रन्सवर आऊट झाला. त्यावेळी हार्दिकचा पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता, असं वाटलं. पण त्यानंतर मैदानावर आलेल्या कॅप्टन संजू सॅमसनने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने आक्रमक फलंदाजी सुरु केली. पहिला विकेट लवकर मिळाला असला, तरी त्याने गुजरातला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही. संजू सॅमसनने 26 चेंडूत 47 धावा फटकावल्या. त्याने दुसऱ्याविकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. संजूने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार खेचले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने साई किशोरच्या गोलंदाजीवर जोसेफकडे झेल दिला.

जोस बटलरची कडक इनिंग एकदा इथे क्लिक करुन पहा

महत्त्वाच्या सामन्यात जोस बटलर चमकला

जोस बटलरने आज सावध सुरुवात केली. त्याने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला नाही. आधी त्याने संयमाने फलंदाजी केली. पण खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर त्याने आपला आक्रमक अंदाज दाखवला. यश दयालच्या 17 व्या षटकात 18 आणि अल्झारी जोसेफच्या 18 व्या षटकात 14 धावा चोपल्या. बटलरने 56 चेंडूत 89 धावा फटकावल्या. यात 12 चौकार आणि दोन षटकार आहेत. शेवटच्या षटकात तो रनआऊट झाला. पण तो पर्यंत त्याने आपलं काम चोख बजावलं होतं. बटलरच्या फटकेबाजीमुळेच राजस्थानच्या प्लेऑफच्या महत्त्वाच्या सामन्यात निर्धारीत 20 षटकात 188 धावांचा डोंगर उभारता आला.

संजू सॅमसनची हल्लाबोल करणारी इनिंग एकदा इथे क्लिक करुन पहा

आज हरणाऱ्या टीमला आणखी एक चान्स

गुजरात आणि राजस्थानमध्ये क्वालिफायर 1 चा सामना होत आहे. आज या दोन टीम्समधून एक संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. हरणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. उद्या लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये एलिमिनेटरचा सामना होईल, त्यात जिंकणाऱ्या टीम बरोबर आज पराभूत होणाऱ्या संघाला खेळावं लागेल.