IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघात बदल, रणजीमध्ये हॅट्रीक घेणारा धुरंदर अष्टपैलू दाखल

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग या सर्वाधिक फॅन्स असणाऱ्या संघामध्ये आहे.

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघात बदल, रणजीमध्ये हॅट्रीक घेणारा धुरंदर अष्टपैलू दाखल
रूश कलारिया

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2021) सुरुवात 19 सप्टेंबरपासून होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (MIvsCSK) यांच्यात होणार आहे. आतापर्यंत 5 वेळा आय़पीएलचं खिताब पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाही जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांनी यासाठी संघात एक बदल देखील केला असून गोलंदाज मोहसीन खानच्या (Mohsin Khan) जागी गुजरातचा वेगवान गोलंदाज रूश कलारिया (Roosh kalaria) याला सामिल करुन घेतलं आहे. आयपीएलने त्यांच्या संकेतस्थळावरुन ही माहिती दिली असून मोहसीनच्या तुलनेत रुश अनुभवी असल्याने याचा फायदा संघाला नक्कीच होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या मोहसीनने आतापर्यंत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळला असून 14 लिस्ट-ए आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 8, 76 आणि 52 विकेट्स पटकावले आहेत. तर रूशच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने गुजरातसाठी 54 प्रथम श्रेणी सामने खेळत त्यात 168 विकेट्स घेतले आहेत. तर 46 लिस्ट-ए सामन्यात 66 विकेट्स घेतले आहेत. 31 टी-20 सामन्यात 37 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने केली असून तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन शतकांसह पाच अर्धशतकं लगावली आहेत. 118 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. विशेष म्हणजे त्याने 2019 च्या रणजी चषकात केरळ संघाविरुद्ध क्वॉर्टर फायनलमध्ये हॅट्रिक घेतली होती.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शिलेदारांची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खास झाली नव्हती. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यातील केवळ 4 सामनेच जिंकले आहेत. उर्वरीत 3 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला असून सध्या मुंबईता संघ 8 गुणांसह दिल्ली, चेन्नई आणि आरसीबीनंतर चौथ्या स्थानावर आहे. सध्या शर्मासह सर्व संघ चिंतेत आहे. कारण पहिल्या 7 ही सामन्यात संघ 150 ते 160 च्या दरम्यानच स्कोर उभा करु शकला आहे. केवळ एकाच सामन्यात मुंबईने पोलार्डच्या मदतीने 200 हून अधिकचा स्कोर गाठला होता. तर  मुंबई इंडियन्सच्या उर्वरीत 7 सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

– 19 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
– 23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 26 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
– 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
– 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा 

IPL 2021: विलगीकरणाचा कालावधी संपताच विराट कोहली मैदानात, एबी डिव्हिलीयर्ससोबत गळाभेटीचा VIDEO पाहाच

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यात कशी असेल हैद्राबादची रणनीती?, स्वत: राशीद खानने सांगितला ‘प्लॅन’

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

(Gujraths roosh kalaria in Mumbai Indians For remaining IPL 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI