AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 2.2 ओव्हर्समध्ये संपली T 20 मॅच, दोन बॉलर्सनी लावली वाट, हे कसले फलंदाज?

क्रिकेटचा T 20 फॉर्मेट सर्वात जास्त अनिश्चित आहे. इथे कधी काय घडेल, याचा नेम नसतो. वेगवेगळे रेकॉर्ड्स या फॉर्मेटमध्ये पहायला मिळतात.

फक्त 2.2 ओव्हर्समध्ये संपली T 20 मॅच, दोन बॉलर्सनी लावली वाट, हे कसले फलंदाज?
Image Credit source: File photo
| Updated on: Jun 06, 2022 | 11:57 AM
Share

मुंबई: क्रिकेटचा T 20 फॉर्मेट सर्वात जास्त अनिश्चित आहे. इथे कधी काय घडेल, याचा नेम नसतो. वेगवेगळे रेकॉर्ड्स या फॉर्मेटमध्ये पहायला मिळतात. काहीवेळा फलंदाज धावांचा पाऊस पाडतात, तर काही वेळा एखादी टीम खूप कमी धावसंख्येवर Allout होते. टी 20 मध्ये कमी धावसंख्येचे अनेक सामने आपण पाहिले आहेत. पण हॅम्पेशायर क्रिकेट लीगमध्ये (Hampshire Cricket League) एक सामना इतका छोटा होता की, अवघ्या 14 चेंडूत ही मॅच संपली. पूर्ण 3 षटकांचा खेळही होऊ शकला नाही. 2.2 षटकात लक्ष्य पार केलं. हॅम्पेशायर क्रिकेट लीगच्या डिवीजन 6 च्या एका सामन्यात दोन गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली. समोरच्या टीमचे फलंदाज खेळपट्टीवर टीकूच शकले नाहीत. समोरच्या संघाला विजयासाठी फक्त 18 रन्सचं टार्गेट मिळालं होतं. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लब आणि ओवर्टन क्रिकेट क्लबमध्ये (Overton cc) हा सामना झाला. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबने हा सामना 8 विकेटने जिंकला. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबने ज्या पद्धतीचा विजय मिळवला, त्याची कल्पना सुद्धा त्यांनी केली नव्हती.

किती फलंदाज शुन्यावर आऊट झाले?

ओवर्टन क्रिकेट क्लबचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबच्या फक्त दोन गोलंदाजांनी ओवर्टन क्रिकेट क्लबच्या फलंदाजीची वाट लावून टाकली. ओवर्टन क्रिकेट क्लबचे 9 फलंदाज शुन्यावर बाद झाले. उरलेल्या दोन फलंदाजांनी मिळून फक्त 3 धावा केल्या.

मग 17 धावा कशा झाल्या?

आता तुम्ही म्हणाल, मग 17 धावा कशा झाल्या? त्यामध्ये ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबचं योगदान आहे. त्यांनी एक्स्ट्रामध्ये 14 धावा दिल्या. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबच्या दोन गोलंदाजांनी मिळून 11 विकेट काढल्या. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबच्या सोफी कुकने 5.3 ओव्हर्समध्ये 4 धावा देऊन 7 विकेट काढल्या. जॉय वॅन डरने 6 षटकात 13 धावा देऊन 3 विकेट काढल्या. ओवर्टनची संपूर्ण टीम 11.3 षटकात ऑलआऊट झाली. ओडीहम एंड ग्रेवेल क्रिकेट क्लबसमोर विजयासाठी फक्त 18 धावांचं लक्ष्य होतं. 14 चेंडूत 2 विकेट गमावून हे लक्ष्य त्यांनी पार केलं

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.