Hardik Pandya: हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपमधील निवडीमागचं सत्य सांगितलं, निवड समिती अध्यक्षांची केली पोलखोल

मागच्यावर्षी दुखापतीमुळे हार्दिक पांड्याकडून अपेक्षित खेळ होऊ शकला नाही. सध्या हार्दिकला कोण पर्याय ठरु शकतं? त्याची चाचपणी सुरु आहे.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपमधील निवडीमागचं सत्य सांगितलं, निवड समिती अध्यक्षांची केली पोलखोल
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:33 AM

मुंबई: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हा प्रतिभावान खेळाडू आता IPL मधील नवीन फ्रेंचायजी अहमदाबादकडून खेळणार आहे. मागच्यावर्षी दुखापतीमुळे हार्दिक पांड्याकडून अपेक्षित खेळ होऊ शकला नाही. सध्या हार्दिकला कोण पर्याय ठरु शकतं? त्याची चाचपणी सुरु आहे. वेगवेगळ्या अष्टपैलू खेळाडूंना संघात संधी दिली जात आहे. मागच्यावर्षी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा (ICC T20 World Cup) झाली. या स्पर्धेत हार्दिकला संघात (Indian Cricket Team) स्थान देण्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बरीच टीकाही झाली होती. कारण संपूर्ण आयपीएलमध्ये हार्दिक दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकला नव्हता. त्यावेळी जी टीका झाली, त्यावर हार्दिकने भाष्य केलं आहे. हार्दिकने त्याची बाजू मांडली आहे.

चेतन शर्मा काय म्हणाले होते? टी-20 या छोट्या फॉर्मेटमध्ये ऑलराऊंडर म्हणून नाही, तर फक्त फलंदाज म्हणून संघात माझी निवड झाली होती, असं हार्दिक पांड्याने सांगितलं. हार्दिकचं हे विधान निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या वक्तव्याच्या बिलकुल उलट आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला गेला, त्यावेळी चेतन शर्मा यांनी हार्दिकची वर्ल्डकप संघात ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आहे, तो त्याच्या कोट्यातील चार षटकं टाकणार असं म्हटलं होतं.

सर्व दोष माझ्यावर टाकला टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या एक्झिटनंतर पराभवासाठी मला जबाबदार धरण्यात आलं, सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आला, असं मला वाटलं असं हार्दिक म्हणाला. बॅकस्टेज विथ बोरिया कार्यक्रमात हार्दिकने हा खुलासा केला. “वर्ल्डकपमध्ये संघाची जी अवस्था झाली, त्यानंतर मला असं वाटलं की, सगळ्याची जबाबदारी माझ्यावरच टाकण्यात आली. संघात एक फलंदाज म्हणून माझी निवड झाली होती. पहिल्या सामन्यात मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण मला जमलं नाही”

भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये खूपच खराब कामगिरी केली होती. साखळी फेरीतच संघाला गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच सामन्यात मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतावर मात केली होती.

hardik pandya says he was picked as a batter in icc t20 world cup not as a all rounder chetan sharma said diffrent

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.