
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ तीन वेळा भिडले. या हायव्होल्टेज सामन्यात आक्रमकता पाहायला मिळाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने या स्पर्धेत सर्वात खालची पातळी गाठली. पहिल्यांदा साखळी फेरीतील सामन्यात आणि त्यानंतर अंतिम फेरीत त्याने घृणास्पद कृत्य केलं होतं. साखळी फेरीत केलेल्या कृत्यानंतर त्याला 2 डिमेरिट पॉइंट दिले होते. पण या नंतरही हारिस रऊफचा माज काही कमी झाला नाही. अंतिम फेरीतही भारतीय खेळाडूंना डिवचण्यासाठी त्याने तसंच कृत्य केलं. यासाठी त्याला आणखी 2 डिमेरिट पॉइंट दिले गेले. यामुळे हारिस रऊफ दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळू शकला नव्हता. पण आता दुसऱ्या वनडे सामन्यातही खेळू शकणार नाही. कारण आयसीसीने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्याच्या सामना फीच्या 60 टक्के दंडही ठोठावला आहे.
दुसरीकडे सूर्यकुमार यादववर मॅच फीच्या 30 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांना आणि भारतीय सैन्याच्या विजयाला समर्पित केला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिरच्या झोंबल्या होत्या. त्यांनी याची तक्रार आयसीसीकडे केली होती. इतकंच काय तर सूर्यकुमार यादवने या संदर्भात माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्या सामना फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे आणि दोन डिमेरिट पॉइंट दिले आहेत.
🚨 ICC PRESS RELEASE ON INDIA vs PAKISTAN 🚨
Suryakumar Yadav – fine of 30% match fee & 2 Demerit Points.
Farhan – 1 Demerit Point.
Haris Rauf – fine of 30% of match fees & 2 Demerit Points. (Group Stage match)
Arshdeep – Was not found guilty.
Bumrah – 1 Demerit Point.… pic.twitter.com/SflzzZlo0M
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2025
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हारिस रऊफची विकेट घेतल्यानंतर फायटर जेट पाडल्याचा इशारा केला होता. त्यामुळे त्यालाही एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. तर अर्धशतकी खेळी केल्यानंतर एके 47 सेलीब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानला एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. दरम्यान, सामन्यानंतर अर्शदीप सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण यात अर्शदीप सिंग काही दोषी आढळला नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.