Explainer : सिम कार्ड रिचार्जशिवाय किती दिवस सुरु राहतो? क्रिकेटर रजत पाटीदारसारखी चूक करु नका
Sim Without Recharge Activation Trai Rules : हल्ली जवळपास प्रत्येक जण 2 सिम कार्ड वापरतो. त्यापैकी 1 सिम कार्ड प्राधान्याने वापरला जातो. तो नंबर आधार, पॅनसह लिंक असतो. मात्र जो दुसरा नंबर ऑप्शनल असतो. त्यामुळे अनेक जण दुसरा नंबर रिचार्ज करत नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे असलेला नंबर डीएक्टीव्ह होऊन कंपनी दुसऱ्या ग्राहकाला देऊ शकते. तुमच्यासोबत क्रिकेटर रजत पाटीदार याच्यासारखं होऊ नये म्हणून आताच जागे व्हा.

जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती घडवून आणली. जिओने सुरुवातीला ग्राहकांना फुकटात अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा दिली. जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये हात पाय पसरवण्यासाठी आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ही योजना राबवली. फुकटात इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा मिळत असल्याने लोकांचाही जिओकडे ओढा वाढला. ठराविक आठवडे फुकटात सर्वकाही दिल्यानंतर जिओने कॉलिंग, डेटा आणि एसएमएसाठी कमी दरात निश्चित कालावधीसाठी प्लान आणला. त्यामुळे स्पर्धेत कायम राहण्यासाठी इतर स्पर्धकांनाही जिओप्रमाणे सारखाच प्लान आणावा लागला. मात्र या प्लानचा फटका ग्राहकांनाच बसला. आधी खात्यातील रक्कम संपल्यानंतर आऊटगोइंग कॉल करताच येत नव्हते. मात्र नव्या रिचार्जनुसार व्हॅलिडीटी संपेपर्यंत हवं तितकं बोलण्याची सुविधा...
