मुका घेतला म्हणून मिका गाऊ लागला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलाशाने सगळेच गायक हादरले
अभिनेत्रीने नुकताच एका पॉडकास्टला हजेरी लावली. त्यावेळी या अभिनेत्रीने जुने प्रकरण पुन्हा उकरले आहे. पण त्या अभिनेत्रीने केलेला दावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री, आयटम गर्ल राखी सावंतही कायमच चर्चेत असते. राखी सावंत कधी तिच्या वक्तव्यामुळे तर कधी कपड्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. राखी सावंतला कॉमेडी क्वीन म्हणून संबोधले जाते. ते लोकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसते. नुकताच राखी सावंतने पंजाबी गायक मिका सिंगसोबत चर्चेत आलेल्या किसिंग प्रकरणावर पुन्हा वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राखी सावंतने एका पॉडकास्टमध्ये नुकताच हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये ती म्हणाली की, मिका यांच्या गळ्यात आधी आवाजच नव्हता. ज्या दिवशी त्याने मला किस केले, त्याच्या आवाजात गोडवा आला. मीकापाजी, वाईट वाटून घेऊ नका. पण सत्य तर तुम्हाला माहीतच आहे.
राखी सावंत पुढे म्हणाली, “आधी ते गात होते, सावन में लग गई आग, दिल मेरा हाय…. मला किस केल्यानंतर हुड दबंग.. दबंग.. दबंग, म्हणजे राखीला किस करून मीकाला सुर मिळाले.” राखीच्या मते, तिच्या टचने किंवा त्या कॉन्ट्रोवर्सीने मीकाला ती ओळख आणि सुर दिले, जे आज त्यांच्याकडे आहेत. राखी सावंतचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
राखी सावंतला जबदस्ती किस करण्याची घटना 2006 सालची आहे. मीका सिंह यांनी त्यांची बर्थडे पार्टी आयोजित केली होती. तेथे मीका आपला संयम गमावून कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतला जबरदस्ती किस करून बसले. मीकाच्या अचानक केलेल्या या कृत्याने राखी आणि पार्टीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हैराण केले. त्यानंतर पार्टीत राखी शांत राहिली. पण नंतर त्यांनी धमाका केला. राखीने सिंगरच्या विरोधात 11 जून 2006 रोजी एफआयआर दाखल केली. मीका सिंह यांच्यावर आयपीसीच्या कलम ३५४ आणि ३२३ अंतर्गत केस दाखल झाली होती.
कोर्टाबाहेर समझोता, केस संपली
२००६ पासून हे प्रकरण कोर्टात अडकले होते. मात्र सुमारे १७ वर्षांनंतर हे प्रकरण सुटले. कोर्टाने या प्रकरणातील एफआयआर आणि चार्जशीट रद्द केली. हे घडले कारण राखी सावंत आणि मीका सिंह यांनी परस्पर सहमतीने हे प्रकरण सोडवले. मीका सिंह यांनी एप्रिल २०२३ मध्ये एफआयआर आणि चार्जशीट रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. राखी सावंत यांनीही कोर्टात एफिडेव्हिट सादर केले होते, ज्यात म्हटले होते की दोघांनी बोलणी करून प्रकरण सोडवले आहे. त्यांना जाणवले की सर्व काही गैरसमजामुळे घडले.
मीकाने म्हटले होते, धडा शिकवण्यासाठी किस केले
या प्रकरणात मीका सिंह यांनी नंतर म्हटले होते की, त्यांनी सर्वांना सांगितले होते की त्यांच्या चेहऱ्यावर केक लावू नये. तरीही राखीने केक लावला. म्हणून राखीला धडा शिकवण्यासाठी त्याने जबरदस्ती किस केले. त्यानंतर मीकाला अटक झाली आणि नंतर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर २०२१ मध्ये दोघांमध्ये सौदा झाला. या काळात ते सार्वजनिकरीत्या एकमेकांना भेटताना दिसले होते.
