T20 World Cup: पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतरच्या विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे जाडेजा नाराज, म्हणाला…

आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाच्या मोहिमेची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला.

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतरच्या विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे जाडेजा नाराज, म्हणाला...
Virat Kohli

दुबई : आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाच्या मोहिमेची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानसमोर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पूर्णपणे ढेपाळला आणि पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभूत झाला. सुरुवातीला शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले, त्यानंतर बाबर आणि त्याचा सलामीचा साथीदार मोहम्मद रिझवान यांनी भारतीय गोलंदाजांना एकही बळी मिळू दिला नाही. (I am Disappointed with Virat Kohli saying India fell behind against Pakistan after losing 2 wickets: Ajay Jadeja)

सामन्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तान संघाचे कौतुक केले आणि सांगितले की, या संघाने आमच्या संघाचा एकतर्फी पराभव केला. भारतासाठी या सामन्यात विराट कोहलीने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली. 57 धावांची इनिंग खेळण्यात तो यशस्वी ठरला. इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. सामना संपल्यानंतर कोहलीने टीम इंडियाबद्दल अशी काही मतं व्यक्त केली होती, जी भारताचा माजी फलंदाज अजय जाडेजाला आवडली नाही. कोहलीचे वक्तव्य ऐकून अजय जाडेजा निराश झाला आहे.

…म्हणून जाडेजा नाराज

क्रिकबझ हिंदीशी बोलताना जाडेजा म्हणाला, “मी त्या दिवशी विराट कोहलीचे विधान ऐकले. तो म्हणाला होता की, ‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आम्ही सुरुवातीच्या दोन विकेट लवकर गमावल्या होत्या तेव्हाच आम्ही बॅटफुटवर ढकलले गेलो होतो. मला त्याचा मुद्दा आवडला नाही. विराट कोहलीसारखा फलंदाज खेळत असताना सामना संपला असे होऊ शकत नाही. त्याने दोन चेंडूदेखील खेळले नव्हते आणि तो नकारात्मक विचार करत होता. याच्यावरुन भारतीय खेळाडूंची मानसिकता कळून येते.”

न्यूझीलंडवर विजय आवश्यक आहे

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता, पण आता दुसऱ्या सामन्यात भारत पराभव सहन करु शकत नाही. 31 ऑक्टोबरला आता टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना करायचा असून या मॅचमध्ये भारताने कोणत्याही किंमतीत जिंकलं पाहिजे. संघाला असे करता आले नाही तर उपांत्य फेरीतील त्यांचा मार्ग कठीण होईल. त्याचबरोबर नेट रेनरेटचा मुद्दाही आहेच. न्यूझीलंडनंतर भारताला अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. या सगळ्यात त्यांना मोठे विजय मिळवावे लागतील. त्याचवेळी न्यूझीलंडचाही पाकिस्तानकडून पराभव झाला आहे. मात्र त्यांचा नेट रनरेट भारतापेक्षा बरा आहे.

इतर बातम्या

India vs New zealand: झहीर खानचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला, सांगितली न्यूझीलंड संघाची खरी ताकद

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

VIDEO: एबी डिव्हिलियर्सप्रमाणे शॉट खेळायला गेला आणि बाद झाला, बांग्लादेशच्या खेळाडूची ही विकेट पाहाच!

(I am Disappointed with Virat Kohli saying India fell behind against Pakistan after losing 2 wickets: Ajay Jadeja)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI