AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : ‘KS Bharat मध्ये मला काही खास दिसत नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूच स्पष्ट मत

Team India : टॅलेंटेड प्लेयरला बसवून त्याच्याजागी पुन्हा केएस भरतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. वास्तवात केएस भरतला बरीच संधी मिळालीय. पण त्याला छाप उमटवता आलेली नाहीय.

Team India : 'KS Bharat मध्ये मला काही खास दिसत नाही', दिग्गज भारतीय क्रिकेटपटूच स्पष्ट मत
Team india Wicket keeper KS BharatImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 16, 2023 | 9:49 AM
Share

नवी दिल्ली : लंडनमध्ये द ओव्हलवर टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दारुण पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 209 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाला कसोटीच्या एकाही दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवता आलं नाही. टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर चाहते नाराज आहेत. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केलेत.

टीम इंडियाने बॅट-बॉलने खराब कामगिरी केलीच. पण टीमच्या सिलेक्शनवरही अनेक प्रश्न आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी टीममधील एका प्लेयरबद्दल स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलय.

तिथेही फ्लॉप शो

WTC फायनलमध्ये टीम इंडियाकडे दोन विकेटकीपर बॅट्समन होते. इशान किशन आणि केएस भरत. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड जोडीने इशानला बसवून केएस भरतला संधी दिली. वास्तवात केएस भरतला अजूनपर्यंत प्रभावी कामगिरी करता आलेली नाहीय. मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो फ्लॉप ठरला होता. WTC फायनलमध्येही तेच चित्र होते. तिथेही भरतला लक्षवेधी कामगिरी करता आली नाही.

‘मी सहमत नाही’

संजय मांजरेकर यांनी भरतच्या याच परफॉर्मन्सवर आपलं मत व्यक्त केलय. ‘इतरांना वाटतं, तसं भरतमध्ये मला स्पेशल दिसत नाही’, असं मांजरेकर म्हणाले. ‘केएस भरत स्पेशल आहे, याच्याशी मी सहमत नाही’ असं मांजरेकर म्हणाले. संजय मांजरेकर प्रसिद्ध कॉमेंटेटर आहेत. दोन्ही इनिंगमध्ये कोणी OUT केलं?

मूळचा आंध्र प्रदेशचा असलेल्या केएस भरत पहिल्या इनिंगमध्ये 15 चेंडूत 5 रन्सवर आऊट झाला. त्याला ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलँडने बोल्ड केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने थोडीफार चांगली कामगिरी केली. 41 चेंडूत 23 धावा केल्या. दुसऱ्या डावात नाथन लायनने आऊट केलं. विकेटपाठी यष्टीरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.