AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: केन विलयम्सनसाठी गुजरात टायटन्स बोली लावणार? हार्दिकच कडक उत्तर

Hardik Pandya: हार्दिक पंड्याने प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती बंद करणारं उत्तर दिलं.

Hardik Pandya: केन विलयम्सनसाठी गुजरात टायटन्स बोली लावणार? हार्दिकच कडक उत्तर
Kane Williamson-Hardik PandyaImage Credit source: BCCI
| Updated on: Nov 16, 2022 | 7:42 PM
Share

वेलिंग्टन: IPL रिटेंशनमध्ये काल अनेक आश्चर्यकारक घडामोडी पहायला मिळाल्या. मुंबई इंडियन्सने रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यापूर्वी कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादने कॅप्टन केन विलयम्सनला रिलीज केलं. मागच्या काही सीजनपासून केन विलयम्सन सनरायजर्स हैदराबादसाठी खेळत होता.

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये केन विलयम्सनने निराश केलं. त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळेच फ्रेंचायजीला त्याला रिलीज करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.

हार्दिकने काय दिलं उत्तर?

सध्या हार्दिक पंड्या टी 20 सीरीजसाठी न्यूझीलंडमध्ये आहे. तो टीम इंडियाच नेतृत्व करतोय. त्याच्याकडे कॅप्टनशिपची जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दिकला बुधवारी आयपीएलमधील तुझा संघ गुजरात टायटन्स केन विलयम्सनसाठी बोली लावणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हार्दिक पंड्याने खूपच सुंदर उत्तर दिलं. “माहित नाही, आता त्याबद्दल विचार करणं हा खूप पुढचा विचार आहे” असं हार्दिकने सांगितलं. टी 20 सीरीजच्या ट्रॉफीच अनावरण केल्यानंतर तो बोलत होता.

लिलावात विलयम्सनवर कुठल्या आयपीएल टीमकडून बोली लावली जाईल, त्यावर हार्दिक म्हणाला की, “आयपीएल आयपीएल आहे. सध्या मी भारतासाठी खेळतोय”

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

वेलिंग्टनमध्ये टी 20 सीरीज ट्रॉफीच्या अनावरणाप्रसंगी हार्दिकने काही महत्त्वाची विधानं केली. “टी 20 वर्ल्ड कपमुळे आमच्यात निराशा आहे. पण आम्ही प्रोफेशनल आहोत. यश मिळाल्यानंतर जसे आपण पुढे जातो, तसं आता निराशेवर मात करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला अजून चांगली कामगिरी करावी लागेल. चूका सुधाराव्या लागतील” असं हार्दिक म्हणाला. शुक्रवारपासन टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीज सुरु होणार आहे.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....