AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 स्पर्धेला ‘या’ तारखेपासून सुरुवात, आयसीसीची मोठी घोषणा

Icc T20 World Cup 2024 Schedule Date | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रमुख तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच सामने कुठे होतील याबाबत माहिती दिली आहे.

T20 World Cup 2024 स्पर्धेला 'या' तारखेपासून सुरुवात, आयसीसीची मोठी घोषणा
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 23, 2023 | 12:02 AM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 दिवसांमध्ये 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 10 संघांमध्ये एका वर्ल्ड कपसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.या वनडे वर्ल्ड कपची लगबग सुरु आहे. त्यात आयसीसीने शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत. आयसीसीने 2024 मध्ये होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलंय. तसेच आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रमुख तारखा प्रसिद्ध केल्या आहेत.

टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या यजमानपदाचा मान हा वेस्टइंडिज आणि अमेरिकेकडे आह. या टी 20 वर्ल्ड कपला 4 जून पासून सुरुवात होणार आहे. तर 30 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन हे वेस्ट इंडिजमधील 7 आणि अमेरिकेतील 3 अशा 10 ठिकाणी करण्यात येणार आलं आहे. त्यानुसार विंडिजमध्ये एटींग्वा, बारबुडा, बारबाडोस, डोमिनिका, गयाना, सेंट लूसिया, सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईंस-त्रिनिदाद टोबॅगो इथे सामने पार पडणार आहेत. तसेच अमेरिकेतील डलास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कमध्ये सामने पार पडतील.

20 टीम 4 ग्रुप आणि 1 ट्रॉफी

या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 च्या हिशोबाने 4 ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे. या चारही ग्रुपमधील टॉप 2 टीम्स सुपर 8 साठी क्वालिफाय करतील. सुपर 8 राउंडसाठी 4-4 टीम 2 ग्रुपमध्ये विभागल्या जातील. या दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 अव्वल संघ हे सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला हा न्यूयॉर्कपासून काही अंतरावर असलेल्या आईजनहावर पार्क स्टेडियममध्ये खेळवण्यात येऊ शकतो.

दरम्यान अखेरचा टी 20 वर्ल्ड कप 2022 हा  ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आला होता. हा वर्ल्ड कप इंग्लंड क्रिकेट टीमने जिंकला होता. तर टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास हा सेमी फायनलमध्येच संपला होता. सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-इंग्लंड विरुद्ध आमनेसामने होते. इंग्लंडने या सामन्यात टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता 2024 ला होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा धमाका करण्याचा प्रयत्न असणार आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर