AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs NZ Toss : न्यूझीलंडने उपांत्य फेरीत फेरीत टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

South Africa vs New Zealand, 2nd Semi Final Icc Champions Trophy 2025 Toss : न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

SA vs NZ Toss : न्यूझीलंडने उपांत्य फेरीत फेरीत टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
SA vs NZ Toss CT 2025 Semi Final 2
| Updated on: Mar 05, 2025 | 2:39 PM
Share

टीम इंडियाने मंगळवारी 4 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर आज 5 मार्चला उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. न्यूझीलंडने निर्णायक टॉस जिंकला. कर्णधार मिचेल सँटनर याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांचा डोंगर उभारणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

न्यूझीलंडने उपांत्य फेरीत बी तर दक्षिण आफ्रिकेने ए ग्रुपमधून क्वालिफाय केलंय. न्यूझीलंडने साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकले. तर टीम इंडियाने न्यूझीलंडला साखळी फेरीतील तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात पराभूत केलं. तर दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकले. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी पाहता तुल्यबळ लढत होईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 73 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडवर वरचढ राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेने 73 पैकी 42 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 26 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे आता या सामन्यात काय निकाल लागतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे .

प्लेइंग ईलेव्हन

न्यूझीलंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कोणताही बदल केलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेने एकमेव बदल केला आहे. नियमित कर्णधार टेम्बा बावुमा याचं कमबॅक झालं आहे. टेम्बाला आजारामुळे 1 मार्च रोजी साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळता आलं नव्हतं. हा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आला होता.

दक्षिण अफ्रीका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), रयान रिकेलटन, रासी वन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एडन मार्करम, वियान मुल्डर, मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.