AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs ENG Toss : अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्ध बॅटिंगचा निर्णय, दोघांसाठी शेवटची संधी

Afghanistan vs England Toss And Playing Eleven : अफगाणिस्तान आणि इंग्लंड दोन्ही संघांनी पराभवाने या स्पर्धेत सुरुवात केली आहे. त्यामुळे लाहोरमध्ये होत असलेला सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे.

AFG vs ENG  Toss : अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्ध बॅटिंगचा निर्णय, दोघांसाठी शेवटची संधी
afg vs eng toss icc champions trophy 2025Image Credit source: @ACBofficials x Account
| Updated on: Feb 26, 2025 | 3:11 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठव्या सामन्यात बी ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागला. कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

दोघांसाठी ‘करो या मरो’

इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील एकूण दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक झालं आहे. अशात आता या सामन्याच्या निकालानंतर एका संघाचं आव्हान संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत कायम राहण्यासाठी दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे.

अफगाणिस्तानची वाईट स्थिती

अफगाणिस्तानची पॉइंट्स टेबलमध्ये अतिशय वाईट स्थिती आहे. अफगाणिस्तान झिरो पॉइंट्स आणि -2.140 अशा नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. तर इंग्लंडही शून्य गुणासह -0.475 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ 3 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना जिंकलाय. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, इंग्लंडविरुद्ध बॅटिंग

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.